'सीएनपी' वाल्यांना जीडीपीचा अर्थ कधीच समजणार नाही, राहुल गांधींना भाजपचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 07:47 PM2021-09-01T19:47:56+5:302021-09-01T19:49:06+5:30
नोटाबंदी झाल्यापासून राहुल गांधी नेहमीच अस्वस्थ दिसून आले आहेत. आजही राहुल गांधी नोटाबंदीमुळे अस्वस्थच होते. साहजिकच, नोटाबंदीमध्ये गांधी कुटुंब आणि काँग्रेस पक्षाने खूप पैसा गमावला असेल, असेही संबित पात्रा म्हणाले.
नवी दिल्ली - जीडीपीमध्ये जोरदार वाढ झाल्यानंतर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महागाईवरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. जीडीपी वाढण्याचा अर्थ सांगत ते म्हणाले, याचा अर्थ गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती वाढणे असा आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरून भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनीही त्यांना टोला लगावला आहे. पात्रा यांनी काँग्रेसवर 'सीएनपी'चा आरोप केला आहे.
पात्रा म्हणाले, राहुल गांधी यांनी भ्रमित करण्यासाठी जीडीपीचा व्याख्येचा अपभ्रंश करून ती देशासमोर ठेवली आहे. काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांचा विचार करता, 'सीएनपी अर्थात करप्शन, नेपोटिझम आणि पॉलिसी पॅरालिसिस वाल्या लोकांना जीडीपीचा खरा अर्थ कधीही समजू शकत नाही.
Rahul Gandhi spoke about issues of which he didn't have a clear knowledge. He tried to redefine GDP in the wrong way. UPA Govt followed CNP - Corruption, Nepotism & Policy Paralysis as their core agenda. They won't be able to understand the real meaning of GDP: Sambit Patra, BJP pic.twitter.com/aijHHPucYY
— ANI (@ANI) September 1, 2021
कोरोना संकटात मोठा दिलासा; २ दिवसांत मोदी सरकारसाठी ४ गुडन्यूज
पात्रा म्हणाले, काल ऐतिहासिक बातमी आली होती. आर्थिक वर्ष 2021-22 साठी, जीडीपीच्या पहिल्या तिमाहीतील विकास दराचा आकडा समोर आला. तो अभूतपूर्व 20.1 टक्क्यांवर पोहोचला. तो महामारी पूर्वच्या स्थितीत जसा होता तसा झाला. हे केवळ पीएम मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वाखाली असलेल्या याच सरकारमुळे शक्य झाले.
नोटाबंदी झाल्यापासून राहुल गांधी नेहमीच अस्वस्थ दिसून आले आहेत. आजही राहुल गांधी नोटाबंदीमुळे अस्वस्थच होते. साहजिकच, नोटाबंदीमध्ये गांधी कुटुंब आणि काँग्रेस पक्षाने खूप पैसा गमावला असेल, असेही संबित पात्रा म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते, राहुल गांधी -
राहुल गांधी आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "पंतप्रधान मोदी वारंवार सांगतायत GDP वाढतोय. अर्थमंत्रीही म्हणतायत GDP वाढतोय. ते नेमके कोणत्या GDP संदर्भात बोलत आहेत, हे मला नंतर समजले. 'Gas-Deisel-Petrol' असा त्याचा अर्थ आहे. त्यांनी जीडीपीबाबत गोंधळ निर्माण केला आहे."
खूशखबर! Retirement चं वय अन् Pension ची रक्कम वाढण्याची शक्यता; मोदी सरकारनं तयार केली खास योजना!
मोदी सरकारने गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या माध्यमाने तब्बल २३ लाख कोटी कमावले -
"मोदी सरकारने गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या माध्यमाने तब्बल २३ लाख कोटींची कमाई केली आहे. हा पैसा नेमका गेला कुठे?", असा सवालही राहुल गांधी यांनी सरकारला विचारला. देशात डिमॉनिटायझेशन आणि मॉनिटायझेशन एकाच वेळी सुरू आहे. मोदींच्या निवडक चार-पाच मित्रांचे मॉनिटायझेशन होत आहे आणि देशातील शेतकरी, कामगार, छोटे दुकानदार, एमएसएमई, नोकरदार वर्ग, सरकारी कर्मचारी आणि इमानदार उद्योगपतींचे डिमॉनिटायझेशन सुरू आहे, असा टोलाही राहुल यांनी यावेळी लगावला होता.