राहुल गांधींनी लावली मणिपूरमध्ये आग; राज्यसभेत दिसला स्मृती इरानींचा रुद्रावतार! कोणत्या प्रश्नावर भडकल्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 06:36 PM2023-07-26T18:36:43+5:302023-07-26T18:37:15+5:30

काँग्रेस मणिपूर हिंसाचारातील तथ्य लपवत असल्याचे म्हणत, ही आग काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लावल्याचा आरोप स्मृती इरानी यांनी केला.

BJP leader Smriti irani got angry in rajya sabha says Rahul Gandhi set fire in Manipur | राहुल गांधींनी लावली मणिपूरमध्ये आग; राज्यसभेत दिसला स्मृती इरानींचा रुद्रावतार! कोणत्या प्रश्नावर भडकल्या?

राहुल गांधींनी लावली मणिपूरमध्ये आग; राज्यसभेत दिसला स्मृती इरानींचा रुद्रावतार! कोणत्या प्रश्नावर भडकल्या?

googlenewsNext

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी बुधवारी मणिपूरसंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर जबरदस्त भडकल्या. यावेळी काँग्रेस मणिपूर हिंसाचारातील तथ्य लपवत असल्याचे म्हणत, ही आग काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लावल्याचा आरोप स्मृती इरानी यांनी केला. त्यांनी हा आरोप प्रश्नोत्तराच्या तासात केला. अमी याज्ञिक यांनी प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नावेळी महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील महिला सहकारी मणिपूरच्या मुद्द्यावर केव्हा बोलणार? असा प्रश्न केला होता. 

यावर स्मृती इराणी संतापल्या आणि म्हणाल्या माझा यावर तीव्र आक्षेप आहे. केवळ महिला मंत्र्यांनीच नाही, तर महिला राजकीय नेत्यांनीही मणिपूरसह छत्तीसगड, राजस्थान आणि बिहारमधील घटनांवरही लक्ष केंद्रित करायला हवे, असे त्या म्हणाल्या. एवढेच नाही, तर या राज्यांतील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांसंदर्भात बोलण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे (काँग्रेस सदस्य याज्ञिक) आहे का? असा प्रति प्रश्नही त्यांनी यावेळी केला. 

स्मृती म्हणाल्या, ‘‘आपल्यात छत्तीसगडसंदर्भात बोलण्याची हिंमत आणि सामर्थ्य आहे? राजस्थानबद्दल बोलायची हिंमत आहे? बिहारसंदर्भात बोलायची हिंमत आहे? लाल डायरीबद्दल बोलण्याची हिम्मत आहे? एवढेच नाही, तर आपल्यात हे बोलण्याचे धाडक केव्हा येईल की, एक काँग्रेस नेते तेथे गेल्यानंतर, मणिपूर जळायला सुरुवात झाली. राहुल गांधींनी मणिपूरला कसे आगीत ढकलले, हे सांगण्याची हिंमत केव्हा होईस?" अशे सवालही त्यांनी यावेळी केले.

याचवेळी, ‘‘काँग्रेसशासित राज्यांतील बलात्काराच्या घटनांवर बोलाण्याची आपली हिंमत आहे? तर आपण या घटनांवर बोलू शकत नसाल, तर केंद्रातील महिला मंत्र्यांवर अनावश्यक दबाव टाकू नका," असा सल्लाही स्मृती इराणी यांनी याज्ञिक यांना दिला.  

Web Title: BJP leader Smriti irani got angry in rajya sabha says Rahul Gandhi set fire in Manipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.