सुब्रमण्यम स्वामींचा राहुल गांधींवर निशाणा; म्हणाले, "शेतकरी आंदोलनासाठी बोलावत होते पण..."
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 04:57 PM2020-12-29T16:57:27+5:302020-12-29T16:59:52+5:30
Subramanian Swamy : राहुल गांधींच्या इटली दौऱ्यावरून सुब्रमण्यम स्वामींची टीका
देशात कृषी कायद्यांविरोधात महिन्याभरापासून शेतकऱ्यांचं आदोलन सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी हे सध्या परदेशी रवाना झाले आहेत. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी राहुल गांधी वैयक्तीक कारणांमुळे परदेशात गेले असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर भाजपानं त्यांच्यावर निशाणा साधला होता. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधी यांच्या या परदेश दौऱ्यावर निशाणा साधला आहे.
"शेतकरी म्हणतात राहुल बाबांना शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यास सांगण्यात आलं होतं. परंतु राहुल बाबांना आजीची आठवण आली," असं म्हणत सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींवर टीका केली. यापूर्वी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनीदेखील राहुल गांधींवर निशाणा साधला होता.
Farmers are saying that Rahul Baba was asked to join the farmers dharna but Rahul Baba ko Naani yaad aagayee.
— Subramanian Swamy (@Swamy39) December 29, 2020
"एकीकडे काँग्रेस आपला १३६ वा स्थापना दिवस साजरा करत आहे आणि दुसरीकडे राहुल गांधी '९ २ ११' झाले," असं शिवराज सिंग चौहान म्हणाले होते. तर दुसरीकडे त्यांच्या परदेशवारीवरून सोशल मीडियावरीही लोकांनी टीका केली होती. जर काँग्रेसनं शेतकरी आंदोलनाला समर्थन दिलं आहे तर त्यांनी देशात राहून त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे, असं काही जणांनी म्हटलं होतं.
It's so unfortunate for Congress that the person who has been its president & is also considered for the post is absent on the foundation day of the party. Nobody knows which country he is in. His absence raises several questions about him & his party:Madhya Pradesh CM SS Chouhan pic.twitter.com/T0iRDXKvoC
— ANI (@ANI) December 28, 2020
नुकताच काँग्रेसचा १३६ वा स्थापना दिवस पार पडला. यावेळी काँग्रेसच्या मुख्यालयावर पक्षाचा झेंडा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एके. अँटनी यांनी फडकावला. यादरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव केसी वेणुगोपाल यांनी राहुल गांधी आपल्या आजीला भेटण्यासाठी इटलीला गेले असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच यात काही चुकीचं नसून प्रत्येकाला आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा हक्क असल्याचंही ते म्हणाले.