"G से गांधी, D से..."; भाजपा नेत्याने राहुल गांधींना सांगितला GDP चा नवा अर्थ, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 03:58 PM2021-09-02T15:58:44+5:302021-09-02T16:13:23+5:30
BJP Narottam Mishra Slams to Congress : मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तेलाच्या किमतीत वाढ झाल्याची थेट झळ देशातील सर्वसामान्य नागरिकाला बसते. जनतेच्या खिशावर याचा परिणाम होतो. प्रवास खर्च वाढल्यानं महागाई वाढते, पण याचा मोदी सरकारला काहीच फरक पडत नाही, असं राहुल गांधी म्हणाले. "पंतप्रधान मोदी वारंवार सांगतायत GDP वाढतोय. अर्थमंत्रीही म्हणतायत GDP वाढतोय. ते नेमकं कोणत्या GDP बाबत बोलत आहेत ते मला नंतर कळलं. 'Gas-Deisel-Petrol' असा त्याचा अर्थ आहे. त्यांनी जीडीपीबाबत गोंधळ निर्माण केलाय", असा खोचक टोला राहुल यांनी यावेळी लगावला आहे. यानंतर आता भाजपाने याला प्रत्युत्तर दिलं आहे.
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (BJP Narottam Mishra) यांनी राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांना प्रत्युत्तर दिलं आहे. "राहुल गांधींना जीडीपीच्या अर्थ काय कळणार?" असा सवाल करत त्यांनी जीडीपीचा नवा अर्थ सांगितला आहे. मिश्रा यांनी "राहुल गांधींसाठी जी म्हणजे गांधी (सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी), डी म्हणजे त्यांचे राजकीय गुरू दिग्विजय सिंह, पी म्हणजे पी. चिदंबरम. मग राहुल गांधींना जीडीपीचा अर्थ काय कळणार?" असा टोला राहुल गांधींवर टीका करताना लगावला आहे.
राहुल गांधी के लिए GDP का अर्थ, G से (सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी),D से उनके राजनीतिक गुरु दिग्विजय सिंह, P से पी. चिदंबरम है। वे क्या जाने GDP का अर्थ: राहुल गांधी द्वारा सरकार के लिए GDP का अर्थ गैस, डीज़ल, पेट्रोल बताने पर मध्य प्रदेश के गृह मंत्री नरोत्तम मिश्रा pic.twitter.com/I90rVvRfFB
— ANI_HindiNews (@AHindinews) September 2, 2021
"मोदी सरकारने गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या माध्यमातून तब्बल २३ लाख कोटींची कमाई केली आहे. हा पैसा नेमका गेला कुठे?", असा सवाल राहुल गांधी यांनी सरकारला विचारला आहे. देशात डिमोनिटायझेशन आणि मॉनिटायझेशन एकाच वेळी सुरू आहे. मोदींच्या निवडक चार-पाच मित्रांचं मॉनिटायझेशन होत आहे आणि देशातील शेतकरी, कामगार, छोटे दुकानदार, एमएसएमई, नोकरदार वर्ग, सरकारी कर्मचारी आणि इमानदार उद्योगपतींचं डिमॉनिटायझेशन सुरू आहे, असाही टोला राहुल यांनी लगावला.
गॅस, डिझेल, पेट्रोलमधून मोदी सरकारनं २३ लाख कोटी कमावले, गेले कुठे?; राहुल गांधींचा सवाल
वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर भाष्य करताना राहुल यांनी यूपीए सरकारच्या काळातील गॅसच्या किमतीची आठवण करुन दिली. २०१४ साली जेव्हा यूपीएचं सरकार संपुष्टात आलं होतं त्यावेळी घरगुती गॅस सिलिंडरचा दर ४१० रुपये इतका होता आणि आज हाच दर ८८५ रुपये इतका झाला आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात तब्बल ११६ टक्क्यांची वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर २०१४ सालापेक्षा सध्या ४२ टक्क्यांनी आणि डिझेलचे दर ५५ टक्क्यांनी वाढले आहेत, अशी आकडेवारी राहुल यांनी सादर केली.
राजद नेत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची केली थेट तालिबानसोबत तुलना#RJD#RSS#Talibans#Afganistan#Politicshttps://t.co/mkb1PX1zq0pic.twitter.com/rigxeKSXVV
— Lokmat (@MiLOKMAT) September 2, 2021