BJP on Rahul Gandhi: सभेत काय बोलायचं, हेच राहुल गांधींना माहिती नाही; भाजपने 'तो' व्हिडओ शेअर मारला टोमणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 09:46 AM2022-05-08T09:46:16+5:302022-05-08T09:46:48+5:30

BJP on Rahul Gandhi: राहुल गांधींचा सभेपूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात ते इतर नेत्यांना, सभेत काय बोलायचं, याबाबत विचारणा करताना दिसत आहेत.

BJP on Rahul Gandhi: Rahul Gandhi does not know what to say in the rally; BJP shares his video | BJP on Rahul Gandhi: सभेत काय बोलायचं, हेच राहुल गांधींना माहिती नाही; भाजपने 'तो' व्हिडओ शेअर मारला टोमणा

BJP on Rahul Gandhi: सभेत काय बोलायचं, हेच राहुल गांधींना माहिती नाही; भाजपने 'तो' व्हिडओ शेअर मारला टोमणा

Next

BJP on Rahul Gandhi: काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा नेपाळच्या एका क्लबमधील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओ राहुल गांधी एका चीनी तरुणीसोबत असून, त्यांच्यासमोर दारुच्या बाटल्याही दिसत आहेत. त्या व्हिडिओनंतर आता राहुल यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरुन भाजपने राहुल गांधींना टोला लगावला आहे.

आता व्हायरल होत असलेला व्हिडिओ तेलंगाणामधील एका सभेपूर्वीचा असून, राहुल गांधी काही नेत्यांसोबत बसलेले दिसत आहेत. सभा सुरू होण्यापूर्वी राहुल गांधी इतर नेत्यांना विचारताना आहेत की, ‘मला सभेत नेमकं काय बोलायचं आहे?’ या व्हिडिओवरुन भाजपने राहुल गांधींची खिल्ली उडवली आहे. 'तुम्ही खाजगी परदेश दौरे आणि नाईट क्लबमध्ये राजकारण करता, तेव्हा असं होतं असतं,' अशी टीका भाजपकडून करण्यात येत आहे.

भाजपचे सोशल मीडिया प्रभारी अमित मालवीय यांनी राहुल गांधींचा हा व्हायरल व्हिडिओ ट्विट करत म्हटले आहे की, "काल तेलंगणातील रॅलीपूर्वी राहुल गांधींनी नेत्यांना विचारले की थीम काय आहे? मला काय बोलायचे आहे? जेव्हा तुम्ही खासगी आयुष्य आणि नाईटक्लबींमध्ये राजकारण करता, तेव्हा असे घडते." नेपाळच्या व्हिडिओवरही अमित मालवीय यांनी राहुल गांधींवर ताशेरे ओढले होते.

ओवेसींचा राहुलवर हल्लाबोल
या व्हिडिओवर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही राहुल यांच्यावर हल्लाबोल करत म्हटले की, "जेव्हा तुम्हाला काय बोलावं हेच कळत नाही, तेव्हा तुम्ही लोकांना काय संदेश द्याल? आणि लोक तुम्हाला का समर्थन देती? तुम्ही टीआरएसशी कसं लढणार?", असे सवाल ओवेसींनी केले.
 

Web Title: BJP on Rahul Gandhi: Rahul Gandhi does not know what to say in the rally; BJP shares his video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.