जवानांचे मनोबल खच्ची करायचे आहे का? अफस्पावरून अमित शहांचा राहुल गांधींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 04:25 PM2019-04-02T16:25:05+5:302019-04-02T16:25:52+5:30
केंद्रात सत्तेवर आल्यास वादग्रस्त अफस्पा कायद्यात सुधारणा करण्याचे आश्वासन काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामधून दिले आहे.
नवी दिल्ली - केंद्रात सत्तेवर आल्यास वादग्रस्त अफस्पा कायद्यात सुधारणा करण्याचे आश्वासन काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामधून दिले आहे. मात्र काँग्रेसने दिलेल्या या आश्वासनावरून भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस अध्यक्ष सीमेवर लढणाऱ्या जवानांची शक्ती वाढवू इच्छितात की, त्यांचे मनोबल खच्ची करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा सवाल अमित शहा यांनी विचारला आहे.
17 व्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा आज प्रकाशित केला. या जाहीरनाम्यातून सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रांसाठी भरघोस आश्वासने देण्यात आली असून, सत्तेत आल्यास काही संवेदनशील कायद्यांमध्येही सुधारणा करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. पूर्वोत्तर राज्यांत आणि जम्मू काश्मीरमध्ये तैनात लष्कराला विशेषाधिकार देणाऱ्या अफस्पा या कायद्यात संशोधन करण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. मात्र काँग्रेसने जाहीरनाम्यामधून दिलेल्या या आश्वासनावरून वादाला तोंड फुटले आहे. ''जे जवान सीमेवर लढत आहेत त्यांचे बळ वाढवायचे आहे की त्यांचे मनोबल खच्ची करायचे आहे, हे मी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना विचारू इच्छितो.'' असा सवाल अमित शहा यांनी केला आहे.
BJP President Amit Shah on Congress party in its election manifesto promising to amend Armed Forces (Special Powers) Act-AFSPA: Main poochna chahta hun Congress adhyaksh ko, jo jawan desh ki seema par larh rahe hain, unko aap bal dena chahte ho ya unka manobal girana chahte ho? pic.twitter.com/sBhITyupcS
— ANI (@ANI) April 2, 2019
उग्रवादी कारवायांमुळे अशांत असलेल्या पूर्वोत्तर भारतातील राज्यांमध्ये तसेच फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांचा धोका असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये अफस्फा हा कायदा लष्कराला विशेषाधिकार बहाल करतो. मात्र या कायद्याचा लष्कराकडून दुरुपयोग करण्यात येत असल्याचा आरोप सातत्याने होत असतात. तसेच हा कायदा हटवण्यात यावा अशी मागणीही होत असते.