No Confidence Motion : 'बन्द करो ये झूठ का फाटक...'; राहुल गांधींच्या 'झप्पी'ला भाजपाचं कवितेतून प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 03:49 PM2018-07-23T15:49:59+5:302018-07-23T15:50:44+5:30

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात  गेल्या शुक्रवारी लोकसभेत मांडल्या गेलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली गळाभेट हीच सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. मात्र या गळाभेटीवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून

BJP Response On Rahul Gandhi hugs to narendra modi | No Confidence Motion : 'बन्द करो ये झूठ का फाटक...'; राहुल गांधींच्या 'झप्पी'ला भाजपाचं कवितेतून प्रत्युत्तर

No Confidence Motion : 'बन्द करो ये झूठ का फाटक...'; राहुल गांधींच्या 'झप्पी'ला भाजपाचं कवितेतून प्रत्युत्तर

googlenewsNext

नवी दिल्ली  - नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात  गेल्या शुक्रवारी लोकसभेत मांडल्या गेलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली गळाभेट हीच सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. मात्र या गळाभेटीवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, राहुल गांधींच्या या गळाभेटीला भाजपाने  कवितेच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. 

अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केले. मात्र भाषण संपल्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदींची घेतलेला गळाभेट आणि नंतर आपल्या शेजारी बसलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांना मारलेला डोळा यामुळे भाजपा नेत्यांना त्यांच्याविरोधात आयतेच कोलीत मिळाले. तेव्हापासून भाजपाच्या मंत्र्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वांनी राहुल गांधींना टीकेचे लक्ष्य करणे सुरू ठेवले आहे. दरम्यान, सोमवारी भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक कविता शेअर केली आहे. "70 साल प्यार का नाटक, बंद करो झूट का फाटक या आशयाच्या या कवितेमधून राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.  





भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांनीही राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना 1984 ची दंगल आणि भागलपूर दंग्यांची आठवण करून दिली. देशात असा कुठलाही मुद्दा नाही ज्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत, असे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे. 





  केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनीही राहुल गांधींना टीकेचे लक्ष्य केले आहे. राहुलजी कुठलीही दुर्घटना घडल्यावर त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करणे बंद करा. सरकारने या प्रकरणी कठोर कारवाई केली आहे. तुम्ही राजकीय लाभासाठी समाजात फूट पाडत आहात, अशा शब्दार पियूष गोयल यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.  





शुक्रवारी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घेतलेल्या गळाभेटीवरून लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी राहुल गांधींना खडेबोल सुनावले होते. मात्र काँग्रेसने याचा राजकीय लाभ घेण्यास सुरुवात करताना मुंबईत पोस्टरबाजी केली होती. तसेच द्वेषाने नाही तर प्रेमाने जिंकणार, असा संदेशही दिला होता.  

Web Title: BJP Response On Rahul Gandhi hugs to narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.