"राहुल गांधींची देश तोडण्याची भाषा, पोलिसांप्रती सहानुभूतीचा एक शब्दही नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 01:25 PM2021-01-30T13:25:40+5:302021-01-30T13:29:10+5:30
BJP Smriti Irani And Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं आहे.
नवी दिल्ली - दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्याने कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागले आहे. आंदोलकांनी थेट लाल किल्ल्यापर्यंत दिलेली धडक तसेच अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये हिंसक झटापटी झाल्याने या आंदोलनावर टीका होऊ लागली आहे. प्रजासत्ताक दिनप्रसंगी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 300 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. हे पोलीस कर्मचारी लाल किल्ला, आयटीओ आणि नांगलौईसह इतर ठिकाणी झालेल्या हिंसाचारात जखमी झाले आहेत. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं आहे.
स्मृती इराणी यांनी राहुल गांधी देश तोडण्याची भाषा करत आहेत. दिल्लीत शेतकरी आंदोलनात हिंसेचं रुप आल्यानंतर अनेक पोलीस, मीडिया प्रतिनिधी जखमी झाले. मात्र त्यांच्याप्रती राहुल गांधींनी एकही सहानुभूतीचा शब्द वापरला नाही असं म्हटलं आहे. "26 जानेवारी दिल्लीत झालेल्या हिंसाचारात 300 पेक्षा जास्त पोलीस जखमी झाले आहेत. याशिवाय काही पत्रकारही जखमी झाले आहेत. अनेक महिला पोलिसांवर हल्ला झाला. मीडिया प्रतिनिधींवर हल्ला झाला. त्यांना ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्याप्रती राहुल गांधी यांच्या तोंडातून एकही संवेदशील शब्द निघाला नाही" असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.
"राहुल गांधी यांनी देश तोडण्याची भाषा केली आहे. मी देशाला विनंती करते, राहुल गांधींच्या या इच्छेला आपण सर्व मिळून अपयशी ठरवू" असं म्हणत इराणी यांनी घणाघात केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात MSP चं सर्वात व्यापक ऑपरेशन झालं. कृषी उत्पन्न बाजार समितीला आणखी बळकट करण्याचं ध्येय असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारतीय सैन्याबाबत केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या विधानवरून भाजपाने त्यांना घेरल्याचं पाहायला मिळत आहे.
"राहुल गांधींना सीमेवर मायनस तापमानात का उभं करू नये?", भाजपा नेत्याचा सवाल
हरियाणाचे मंत्री आणि भाजपा नेते अनिल विज (Anil Vij) राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी यांनी देशाच्या जवानांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच राहुल गांधी यांना देशाच्या सीमेवर मायनस तापमानात का उभं करू नये? असा सवाल देखील अनिल विज यांनी केला आहे. विज यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच राहुल गांधींवर निशाणा साधत टीका केली आहे. "राहुल गांधी सातत्याने देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या सैनिकांचा अपमान करत आहेत. ते काही गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना मायनस तापमानात का उभं करू नये?, देशाच्या शत्रूंचा सामना करण्यासाठी उभं राहिल्यावर एका दिवसात त्यांना सर्व गोष्टी समजतील" असं अनिल विज यांनी म्हटलं आहे.
"राहुल गांधी सातत्याने देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या सैनिकांचा अपमान करत आहेत"https://t.co/awvOhXlNoN#RahulGandhi#AnilVij#Congress#BJPpic.twitter.com/o54NY8Zvjs
— Lokmat (@MiLOKMAT) January 25, 2021
इंदूर विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका महिलेने जोरदार गोंधळ घालत आपल्याला विमानतळावर प्रवेश देण्याची मागणी केली. विशेष म्हणजे या महिलेने मी राहुल गांधींशी लग्न करायला चालले आहे. मला दिल्लीला जाऊ द्या असं म्हणत विमानतळावर गोंधळ घातला आहे. विमानाचं कोणतंही तिकीट नसताना महिलेला विमानतळावर प्रवेश करायचा होता. महिलेने विमानतळावर चांगलाच गोंधळ घातला. तिकीट नसतानाही ही महिला बरंच सामान घेऊन विमानतळावर आपल्याला प्रवेश देण्यात यावा यासाठी सुरक्षारक्षकांसोबत वाद घालत होती. सुरक्षारक्षकांनी तिला थांबवलं तेव्हा ही महिला सुरक्षारक्षकांनाच धमकी देऊ लगाली. मी राहुल गांधींची होणारी पत्नी आहे असं सांगितलं. तसेच राहुल गांधी मला भेटायला येत नाहीत म्हणून मीच त्यांना भेटायला दिल्लीला जात आहे. मला त्यांच्याशी लग्न करायला जायचं आहे. जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा तुम्ही सर्वजण मला सलाम कराल असंही ही देखील महिलेने सुरक्षारक्षकांना म्हटलं आहे.
"मी राहुल गांधींची होणारी पत्नी आहे. ते मला भेटायला येत नाहीत म्हणून मीच त्यांना भेटायला दिल्लीला जातेय"https://t.co/k6q7XxPMCx#Congress#RahulGandhi
— Lokmat (@MiLOKMAT) January 30, 2021