Video - "गांधी कुटुंबातील लोक जोपर्यंत पक्षामध्ये असतील तोपर्यंत काँग्रेस पाताळात"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 04:20 PM2020-07-14T16:20:41+5:302020-07-14T16:59:45+5:30
राजस्थानमधील ही परिस्थिती राहुल गांधी यांच्यामुळेच उद्भवली आहे. राहुल आणि प्रियंका गांधी हे काँग्रेसचा नाश होण्यामागचं कारण आहेत. गांधी घराण्याचे लोक जोपर्यंत काँग्रेसमध्ये असतील तोवर काँग्रेस पाताळात जाईल अशी जोरदार टीका उमा भारती यांनी केली.
नवी दिल्ली - राजस्थानमध्ये सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या काँग्रेसनं मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान देणाऱ्या सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या तीन समर्थक आमदारांची मंत्रिपदंदेखील काढून घेण्यात आली आहेत. राजस्थानमधील सत्तासंघर्षावर भाजपाच्या नेत्या उमा भारती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केला आहे.
राजस्थानमधील ही परिस्थिती राहुल गांधी यांच्यामुळेच उद्भवली आहे. राहुल आणि प्रियंका गांधी हे काँग्रेसचा नाश होण्यामागचं कारण आहेत. गांधी घराण्याचे लोक जोपर्यंत काँग्रेसमध्ये असतील तोवर काँग्रेस पाताळात जाईल अशी जोरदार टीका उमा भारती यांनी केली आहे. तसेच तरूणांना अपमानित करतात. ते स्वत: काम आणि मेहनत करू इच्छित नाहीत असं देखील उमा यांनी म्हटलं आहे. "राजस्थानमध्ये सध्या निर्माण झालेलं संकट हे राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांमुळेच निर्माण झालं आहे. ते तरूणांना अपमानित करतात. स्वत: काम आणि मेहनत करू इच्छित नाहीत" असं म्हणत उमा भारती यांनी गांधी परिवारावर निशाणा साधला आहे.
#WATCH: "The whole crisis (in Rajasthan) is due to Rahul Gandhi and his family because they insult young leaders and are jealous of them... Gandhis only want those do "he he he" with them to stay in government," says BJP leader Uma Bharti pic.twitter.com/zqFpkkbEOc
— ANI (@ANI) July 14, 2020
"तरूण आणि बुद्धीवान नेत्यांना त्यांनी एवढा अपमान केला की तो त्यांना सहन झाला नाही. त्यांच्या समोर दुसरा कोणताही मार्ग नव्हता. सचिन पायलट हे राजेश पायलट यांचे सुपुत्र आहेत. राजेश पायलट हे माझ्या भावासारखे होते. आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि सचिन पायलट हे स्वाभिमानी व्यक्ती आहेत हे मला माहीत आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबातील लोक जोपर्यंत काँग्रेसमध्ये असतील तोपर्यंत काँग्रेस पाताळात जाईल" असं उमा भारती यांनी म्हटलं आहे.
"काँग्रेसमध्ये राहुल गांधी युवा नेत्यांना मोठं होऊ देत नाहीत"https://t.co/NkoDOCTfJ6#Rajasthan#RajasthanPoliticalCrisis#RahulGandhi#Congress
— Lokmat (@MiLOKMAT) July 13, 2020
राजस्थानमध्ये उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीला राहुल गांधी जबाबदार आहेत असा आरोप उमा भारती यांनी सोमवारी केला होता. तसेच मध्य प्रदेशामधील परिस्थितीलाही तेच जबाबदार होते असं देखील म्हटलं होतं. "काँग्रेसमध्ये युवा नेत्यांना राहुल गांधी मोठं होऊ देत नाहीत. ज्योतिरादित्य शिंदे यांची काँग्रेसमध्ये घुसमट होत होती. आता सचिन पायलट यांची परिस्थितीही काही फारशी वेगळी नाही" उमा भारती यांनी सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी आज परत एकदा राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बंगल्याबाबत प्रियंका गांधींनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या...https://t.co/xj6b0w4D3y#PriyankaGandhi#NarendraModi#Congress
— Lokmat (@MiLOKMAT) July 14, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : बापरे! कोरोनाग्रस्ताला आली पान मसाल्याची तलफ, रुग्णालयातून काढला पळ अन्...
CBSE Results 2020 : मोठी बातमी! CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर
चीनने 59 अॅप्सच्या बंदीवर पुन्हा एकदा विचारला प्रश्न, भारताने दिलं 'हे' सडेतोड उत्तर
बंगल्यात आणखी काही दिवस राहू द्या, प्रियंका गांधींनी केली मोदींना विनंती?, जाणून घ्या सत्य
Vikas Dubey Encounter : विकास दुबेचा आणखी एक प्लॅन आला समोर, रिक्षाचालकाने केला खुलासा