BJP-Congress: काँग्रेसची खोचक टीका, RSSचा पोषाख जाळल्याचा फोटो ट्विट; भाजपचा गांधींवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 01:35 PM2022-09-12T13:35:04+5:302022-09-12T13:35:46+5:30
Bharat Jodo Yatra: RSSचा पोषाख जाळल्याचा फोटो काँग्रेसने शेअर केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
BJP-Congress: काँग्रेसने(Congress) देशभर 'भारत जोडो' (Bharat Jodo Yatra) यात्रा सुरू केली आहे. स्वतः राहुल गांधी इतर काँग्रेस नेत्यांसह या देशभर फिरणार आहेत. यादरम्यान काँग्रेसने RSSबद्दल केलेल्या एका ट्विटवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसच्या ट्विटवर भारतीय जनता पक्षाने (BJP) जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसवर निशाणा साधला. गांधी कुटुंबाच्या सांगण्यावरूनच संघाचा अपमान करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
To free the country from shackles of hate and undo the damage done by BJP-RSS.
— Congress (@INCIndia) September 12, 2022
Step by step, we will reach our goal.#BharatJodoYatra 🇮🇳 pic.twitter.com/MuoDZuCHJ2
काँग्रेसच्या ट्विटवरून वाद वाढला
काँग्रेसने भारत जोडो यात्रेदरम्यान अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले, ज्यामध्ये आरएसएसच्या पोशाखाला आग लावल्याचे दिसत आहे. या फोटोवर 'अजून 145 दिवस बाकी' असेही लिहिले आहे. फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'देशाला द्वेषाच्या वातावरणातून मुक्त करण्याच्या आणि आरएसएस-भाजपने केलेल्या नुकसानीची भरपाई करण्याच्या दिशेने आम्ही एक-एक पाऊल टाकत आहोत,' असे लिहिले आहे.
#WATCH | I don't want to talk about T-shirts, underwear. If they (BJP) want to make an issue about containers, shoes or T-shirts, it shows that they are afraid and can say anything. 'Jhoot ki factory' is running overtime on social media: Congress' Jairam Ramesh, in Delhi pic.twitter.com/xavd55Yjf1
— ANI (@ANI) September 12, 2022
जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया टाळली
काँग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी या ट्विटवर काहीही बोलण्यास नकार दिला. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, 'मला टी-शर्ट, अंडरवेअरबद्दल बोलायचे नाही. जर त्यांना (भाजप) कंटेनर, शूज किंवा टी-शर्टबद्दल मुद्दा काढायचा असेल तर ते घाबरले आहेत आणि काहीही बोलू शकतात हे दिसून येत आहे. यावर बोलणे बालिशपणाचे असेल. सोशल मीडियावर 'लबाडांची फॅक्टरी' ओव्हरटाईम करत आहे,' असे ते म्हणाले.