जन आशीर्वाद यात्रेत शिवराज सिंह चौहान यांच्या गाडीवर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 09:08 AM2018-09-03T09:08:14+5:302018-09-03T10:03:50+5:30

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केल्याची  घटना घडली आहे.

black flag shown and stone pelted on cm shivraj singh jan ashirwad yatra | जन आशीर्वाद यात्रेत शिवराज सिंह चौहान यांच्या गाडीवर दगडफेक

जन आशीर्वाद यात्रेत शिवराज सिंह चौहान यांच्या गाडीवर दगडफेक

Next

भोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केल्याची  घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील चुरहट येथे रविवारी शिवराज सिंह चौहान यांच्या जन आशीर्वाद यात्रेचं आयोजन करण्यात आले होते. यावेळेस त्यांच्या रथावर अज्ञातांनी दगडफेक केली. सुदैवानं या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या रथाच्या काचा फुटल्यानं त्याचे नुकसान झाले आहे. दरम्यान, दगडफेक कोणी केली, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाही. पण दगडफेकीस भाजपानंकाँग्रेसला जबाबदार ठरवलं आहे.  

भाजपाचे नेते राकेश सिंह यांनी काँग्रेसनं दगडफेक केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात ट्विट करत त्यांनी म्हटले आहे की, ''चुरहट विधानसभा क्षेत्रात शिवराज सिंह चौहान यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या रथावर केलेली दगडफेक हे भ्याडपणाचं लक्षणं आहे. सभ्य समाजात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. या भ्याड हल्ल्यास खुद्द जनता काँग्रेसला चोख प्रत्युत्तर देईल''. 

तर दुसरीकडे, मध्य प्रदेश भाजपाचे मीडिया प्रभारी लोकेंद्र पराशर यांनी म्हटलं की, चुरहटमध्ये जन आशीर्वाद यात्राला जनतेचं मोठ्या प्रमाणात समर्थन मिळाले. यामुळे काही जणांनी घाबरुन अशा पद्धतीनं दगडफेक केली. राज्यातील जनता आणि ईश्वर मुख्यमंत्र्यांसोबत आहेत. भ्याड हल्ला करणाऱ्यांनो, जनता तुम्हाला योग्य उत्तर देईल.

काळे झेंडेही दाखवले...
सीधी जिल्ह्यातील मायापूर येथे शिवराज सिंह चौहान यांना विरोध दर्शवत काळे झेंडे दाखवण्यात आले. पण काळे झेंडे दाखवणाऱ्यांबाबतची माहिती अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नाही.




 



Web Title: black flag shown and stone pelted on cm shivraj singh jan ashirwad yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.