हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 06:40 PM2024-10-01T18:40:06+5:302024-10-01T18:40:40+5:30

Dharam Singh Chhoker : गेल्या विधानसभा निवडणुकीत धरमसिंह छौकर यांनी मोठा विजय मिळवला होता. त्यांना ८१ हजारांहून अधिक मते मिळाली होती.

Blow to Haryana Congress: High court asks ED, police to arrest MLA Dharam Singh Chhoker if he doesn’t surrender | हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

Haryana Elections 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीने उतरले आहेत. मात्र, या विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने समलखा येथील काँग्रेसचे उमेदवार धरमसिंह छौकर यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. धरमसिंह छौकर यांच्याविरुद्धच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने २ ऑक्टोबरपर्यंत त्यांनी आत्मसमर्पण करावे, अन्यथा पोलिसांकडून अटक करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

काँग्रेस नेते आणि विद्यमान आमदार धरमसिंह छौकर यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतरही कोणतीही कारवाई झालेली नाही. अजामीनपात्र वॉरंट असतानाही धरमसिंह छौकर हे हरियाणा विधानसभेची निवडणूक लढवत असून प्रचारही करत असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दरम्यान, पानिपतमधील समलखा येथील स्वत:ला समाजसेवक म्हणवून घेणाऱ्या वीरेंद्र सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले आहे.

याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि हरियाणा सरकारला १ ऑक्टोबर रोजी न्यायालयात उत्तर द्यायचे होते. यानंतर पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने समलखाचे उमेदवार धरमसिंह छौकर यांना अटक करण्याचे आदेश दिले. दरम्यान, धरमसिंह छौकर आणि त्यांच्या मुलांविरुद्ध फसवणूक संबंधित अनेक गुन्हे दाखल आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत धरमसिंह छौकर यांनी मोठा विजय मिळवला होता. त्यांना ८१ हजारांहून अधिक मते मिळाली होती.

काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
दरम्यान, हरियाणातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी सुद्धा राज्यात प्रचारसभा घेत आहेत. सध्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी हरियाणात अनेक जाहीर सभांना संबोधित केले आहे. हरियाणातील आपला बालेकिल्ला आणखी मजबूत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. यावेळी हरियाणात भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष एकमेकांना स्पर्धा करताना दिसत आहेत. त्यामुळे काँग्रेसला एकही जागा गमवायची नाही. अशा परिस्थित उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे काँग्रेसच्या उमेदवारासह काँग्रेसच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Web Title: Blow to Haryana Congress: High court asks ED, police to arrest MLA Dharam Singh Chhoker if he doesn’t surrender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.