ब्रेकिंग! ज्योतिरादित्य शिंदेच्या हाती 'कमळ'; मध्य प्रदेशात भाजपाला मोठं बळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 02:34 PM2020-03-11T14:34:22+5:302020-03-11T15:07:55+5:30
MP political Crisis, Jyotiraditya Scindia: काँग्रेसने मंगळवारी भोपाळमधील कार्यालयातील शिंदे यांच्या नावाची पाटी हटविली आहे. येत्या 16 तारखेला विधानसभेचे अधिवेशन आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकप्रमाणे मध्य प्रदेशातही सत्तानाट्य रंगले आहे.
नवी दिल्ली : मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. दुपारी 12.30 वाजता होणारा हा प्रवेश दुपारी 2.55 ला घेण्यात आला.
दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. होळीच्या दिवशीच मध्य प्रदेशमध्ये कोमेजलेल्या भाजपामध्ये उत्साहाचे भरते आले होते. कारण काँग्रेसचे मोठे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. याचबरोबर 22 आमदारांनीही विधानसभाध्यक्षांकडे राजीनामा पाठवून दिल्याने काँग्रेस अल्पमतात आली आहे. मात्र, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी कर्नाटकात असलेल्या 19 पैकी १३ आमदार काँग्रेसमध्ये परतणार असल्याचा दावा केला आहे. या आमदारांना शिंदे राज्यसभेसाठी उभे राहत असून त्यांना मत देण्यासाठी दुसरीकडे ठेवण्याचे सांगून नेण्यात आल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे.
काँग्रेसने मंगळवारी भोपाळमधील कार्यालयातील शिंदे यांच्या नावाची पाटी हटविली आहे. येत्या 16 तारखेला विधानसभेचे अधिवेशन आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकप्रमाणे मध्य प्रदेशातही सत्तानाट्य रंगले आहे. महत्वाचे म्हणजे काँग्रेसचे बंडखोर आमदार बेंगळुरुमधीलच हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. तर अन्य़ एका आमदाराने कालच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एवढ्या राजकीय घडामोडी घडलेल्या असूनही काँग्रेस बहुमताचा आकडा गाठण्याचा दावा करत आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात जेपी नड्डा यांचा मुलगा गिरीष याच्या विवाहाचे रिसेप्शन ठेवण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, रेल्वेमंत्री पियुष गोयल आदी भाजपाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी नड्डा व्यस्त असताना चौहान, गोयल यांची अमित शहांसोबत एका कोपऱ्यात सिक्रेट मिटिंग झाली. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपात आणण्याची चर्चा झाल्याचे कळते आहे.
Delhi: Jyotiraditya Scindia is on his way to BJP office and will join the party shortly. https://t.co/rzN1OB8W4Xpic.twitter.com/7i09FkOYBJ
— ANI (@ANI) March 11, 2020
#WATCH Live from Delhi: Jyotiraditya Scindia joins Bharatiya Janata Party (BJP), in presence of BJP President JP Nadda https://t.co/xBIMuF4CKZ
— ANI (@ANI) March 11, 2020
काँग्रेसच्या नेतृत्वावर शिंदे नाराज आहेत. ते जर भाजपात आले तर गमावलेले मोठे राज्य पुन्हा भाजपाच्या ताब्यात येईल, असे अमित शहा यांना सांगण्यात आले. यानंतर शिंदे यांच्या मागे किती आमदार आहेत यावरही चर्चा झाली. हा आकडा दाखविण्यासाठीच शिंदे समर्थक असलेल्या 19 आमदारांना थेट बेंगळुरूला हलविण्यात आले. कमलनाथ सरकार अल्पमतात आल्याची खात्री पटल्यानंतर रिसेप्शनच्या तीन दिवसांनी मंगळवारी ज्योतिरादित्य शिंदेंच्या भाजप प्रवेशाला अमित शहा यांनीच हिरवा कंदील दाखविला. यानंतर कुठेही नड्डा प्रकाशात आले नाहीत. मंगळवारीही अमित शहांनीच शिंदेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेट घडवून आणली.
Delhi: #JyotiradityaMScindia joins BJP at party headquarters, in the presence of party president JP Nadda. pic.twitter.com/YiF3hMXJav
— ANI (@ANI) March 11, 2020
ज्योतिरादित्य शिंदेंना गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधींना भेटायचे होते, पण...
ज्योतिरादित्य यांच्या बंडामुळे मध्य प्रदेश सरकार धोक्यात; सपा-बसपाचे सदस्यही भाजपच्या तंबूत
'बंडखोरी'ला मोठा इतिहास; ज्योतिरादित्यांच्या आजीनेही काँग्रेस सरकार पाडलेले
राजीनामा नाही, काँग्रेसने हकालपट्टी केली; ज्योतिरादित्यांवर ठेवला गंभीर आरोप
...म्हणून आजचा दिवस ज्योतिरादित्य सिंधियांसाठी खास; लवकरच धरणार भाजपचा 'हात'
आणीबाणीने कुटुंब फोडलेले, ज्योतिरादित्य सिंधिया आज जोडणार; राजमातेचे स्वप्न पूर्ण करणार