"अर्थमंत्री हसत आहेत..., कमाल आहे..."! संसदेत राहुल गांधींच्या कोणत्या विधानावर हसल्या निर्मला सीतारमन?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 04:14 PM2024-07-29T16:14:40+5:302024-07-29T16:16:09+5:30
निर्मला सितारान यांच्याकडे बोट दाखवत राहुल गांधी म्हणाले, "अर्थमंत्री हसत आहेत. कमाल आहे. ही काही हसण्याची गोष्ट नाही, मॅडम."
काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (29 जुलै 2024) लोकसभेत अर्थसंकल्पावर भाषण केले. यावेळी राहुल यांनी अर्थसंकल्पावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि दलित, मागास आणि गरीब वर्गाचा मुद्दा उपस्थित करत अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी काहीही नसल्याचा दावा केला. बजेटला हल्वा संबोधत राहुल गांधी म्हणाले, 20 जणांनी बजेट तयार केले आहे, यात अल्पसंख्याक आणि मागास समाजाचे केवळ दोनच लोक होते.
भाषण सुरू असतानाच राहुल गांधी अर्थमंत्री निर्मला सीतारन यांच्याकडे बोट दाखवत म्हणाले, "आपण हसत आहात, पण ही हसण्यासारखी गोष्ट नाही. राहुल म्हणाले, 20 अधिकाऱ्यांनी भारताचा अर्थसंकल्प तयार केला आहे. म्हणजेच अर्थसंकल्पाचा हल्वा वाटण्याचे काम 20 जणांनी केले आहे. आता सभापती महोदय, त्या 20 लोकांमध्ये 90 टक्के लोकांपैकी केवळ दोनच आहेत. एक अल्पसंख्यक, एक ओबीसी आणि या फोटोत एकही नाही. 'तुम्ही फोटोकडे पाठ फिरवली. त्याला फोटोमध्ये दिसण्याचीही परवानगी नव्हती. 'फोटोमध्ये आपण मागे केले. फोटोमद्ये तर येऊच दिले नाही."
यावेळी, राहुल गांधी यांनी संसदेत फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना रोखले आणि संसदेत असे फोटो दाखवण्याची परवानगी नसल्याचे सांगितले. राहुल गांधी म्हणाले, "मला वाटत होते की, अर्थसंकल्पात जात जनगणनेच्या मुद्द्यावर चर्चा होईल. जे संपूर्ण देशाला हवे आहे. 95 टक्के लोकांना जात जनगणना हवी आहे. दलित, आदिवासी, मागास, गरीब सामान्य जाती आणि अल्पसंख्यक, या सर्वांनाच जात जनगणना हवी आहे. कारण प्रत्येकाला आपला सहभाग काय आहे आणि वाटा काय आहे? हे जाणून घ्यायचे आहे. पण सर, मी बघत आहे की, सरकार हलव्याचे वाटप करत आहे आणि तो वाटणारे केवळ 2-3% लोक असतात आणि वाटतात कुणाला तर ते केवळ 2-3% लोक."
यावेळी, निर्मला सितारान यांच्याकडे बोट दाखवत राहुल गांधी म्हणाले, "अर्थमंत्री हसत आहेत. कमाल आहे. ही काही हसण्याची गोष्ट नाही, मॅडम. ही काही हसण्याची गोष्ट नाही. ही जात जनगणना आहे. यामुळे देश बदलेल." एवढेच नाही तर, "महोदय, पद्मव्यूह किंवा चक्रव्यूहच्या लोकांना वाटते की देशातील मागासलेले लोक अभिमन्यू आहेत. देशातील मागासलेले लोक अभिमन्यू नसून अर्जुन आहेत. ते तुमचे हे चक्रव्यूह तोडून टाकतील आणि I.N.D.I.A. आघाडीने पहिले पाऊल टाकले आहे," असेही राहुल म्हणाले.