Opinion Poll: या राज्यात भाजपाला मोठा धक्का बसणार, काँग्रेस पुन्हा सरकार स्थापन करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 06:15 PM2023-03-26T18:15:12+5:302023-03-26T18:18:35+5:30
Chhattisgarh Opinion Poll: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या वर्षाच्या अखेरीपर्यंत देशातील विविध राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकांची सेमी फायनल म्हणून पाहिले जात आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या वर्षाच्या अखेरीपर्यंत देशातील विविध राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकांची सेमी फायनल म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान, या वर्ष अखेरीस छत्तीसगडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ओपिनियन पोल समोर येऊ लागले आहेत. आज एबीपी न्यूज आणि Matrize यांनी केलेला ओपिनियन पोल समोर आला असून, या पोलनुसार राज्यात आज निवडणुका झाल्यास पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेवर येणार आहे.
एबीपी न्यूज आणि Matrize यांनी केलेला ओपिनियन पोलनुसार छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत मतांच्या बाबतीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये कडवी टक्कर होण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसला ४४ टक्के तर भाजपाला ४३ टक्के मते मिळतील अशी शक्यता या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आली आहे. तर इतरांच्या खात्यात १३ टक्के मते जातील, असे या ओपिनियन पोलमध्ये म्हटले आहे.
या ओपिनियन पोलनुसार विधानसभेच्या ९० जागा असलेल्या छत्तीसगडमध्ये काँग्रेसला ४५ ते ५२ तर भाजपाला ३४ ते ३९ जागा मिळतील. तर इतरांच्या खात्यात १ ते ०५ टक्के जागा जातील. एबीपी न्यूजसाठी Matrize ने हा सर्व्हे राज्यातील सर्व ९० जागांवर केला आहेत.
छत्तीसगडमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तिथे सत्ताधारी काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजपा हे आमनेसामने असतील. दरम्यान, २०१८ मध्ये झालेल्या छत्तीसगड विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपाची १५ वर्षांपासूनची सत्ता उखडून टाकत विजय मिळवला होता.