"मोदी सरकार झोपेत असताना चीनच्या कुरापती सुरू", राहुल गांधींचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 09:35 AM2020-12-20T09:35:51+5:302020-12-20T09:40:37+5:30

Congress Rahul Gandhi And Narendra Modi :राहुल गांधी यांनी कोरोनासह विविध मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

China continues to make diligent preparations while GOI sleeps says rahul gandhi | "मोदी सरकार झोपेत असताना चीनच्या कुरापती सुरू", राहुल गांधींचं टीकास्त्र

"मोदी सरकार झोपेत असताना चीनच्या कुरापती सुरू", राहुल गांधींचं टीकास्त्र

Next

नवी दिल्ली - देशात सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनासह विविध मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा राहुल गांधींनी जोरदार निशाणा साधला आहे. "मोदी सरकार झोपेत असताना चीनच्या कुरापती सुरू झाल्या आहेत" असं राहुल यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "मी आजपर्यंत अनेकदा चीनकडून येणाऱ्या संभाव्य धोक्यांची कल्पना ही सरकारला दिली आहे. मोदी सरकार झोपेत असताना चीनच्या कुरापती सुरू झाल्या आहेत. चीनने जी नवी खेळी केली आहे ती भारतासाठी धोकादायक ठरू शकते" असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. यासोबतच त्यांनी एका बातमीचा देखील संदर्भ दिला आहे. ज्यामध्ये चीनने काराकोरमला कमी वेळात पोहचण्यासाठी एक नवा रस्ता तयार करण्यास सुरुवात केली आहे. हा रस्ता भारताची डोकेदुखी ठरू शकतो असं म्हटलं आहे.

"देशातील कोट्यवधी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर घणाघात

देशातील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  "देशातील कोट्यवधी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं" असं म्हणत राहुल यांनी निशाणा साधला आहे. "देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीवर तर जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधानांनी २१ दिवसांत कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्याचा दावा केला होता. मात्र, अनियोजित लॉकडाऊनमधून ते साध्य झालं नाही. पण, देशातील कोट्यवधी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं" असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

"अनेक शेतकऱ्यांनी बलिदान दिलं, मोदी सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या"

राहुल गांधी यांनी याआधी बाबा राम सिंह यांना श्रद्धांजली वाहत मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. "अनेक शेतकऱ्यांनी बलिदान दिलं आहे. मोदी सरकारने मात्र क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत" असं म्हणत राहुल गांधींनी हल्लाबोल केला होता. "कुंडली सीमेवरील शेतकर्‍यांची दुर्दशा पाहून व्यथीत झालेल्या कर्नालच्या संत बाबा राम सिंह यांनी आत्महत्या केली आहे. या दुःखाच्या क्षणी आपल्या संवेदना आणि श्रद्धांजली. अनेक शेतकऱ्यांनी आपलं बलिदान दिलं आहे. मोदी सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. सरकारने जिद्द सोडावी आणि कृषी कायदे त्वरित मागे घ्यावे"असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं.

Web Title: China continues to make diligent preparations while GOI sleeps says rahul gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.