देशाच्या जमिनीवर नव्हे तर सोनिया, राहुल यांच्या मनावर चीनचा कब्जा, भाजपाची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 05:46 PM2020-06-23T17:46:28+5:302020-06-23T18:00:15+5:30
लडाखमधील चिनी घुसखोरीवरून काँग्रेसकडून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू असतानात आता भाजपाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना थेट लक्ष्य केले आहे.
नवी दिल्ली - भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरू असलेला विवाद जैसे थे आहे. मात्र इकडे देशाच्या राजधानीत सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये सीमावादावरून सुरू असलेल्या आरोपप्रत्यारोपात मात्र रोज नववने अंक सादर होत आहेत. काँग्रेसकडून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू असतानात आता भाजपाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना थेट लक्ष्य केले आहे.
काँग्रेसकडून देशाच्या जवानांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहेत. देशाचे लष्करप्रमुख लेहच्या दौऱ्यावर असताना सीडब्ल्यूसीची बैठक घेऊन त्यामध्ये लष्कराच्याविरोधात चर्चा केली जात होती, आता तुम्हाला काय लष्करासोबत लढायचे आहे का, असा सवाल भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.
काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देताना संबित पात्रा म्हणाले की, भारताने एक इंचसुद्धा जमीन चीनला दिलेली नाही. तसेच इंचभर जमीनसुद्धा कुणी आमच्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही, मात्र दु:खाची बाब म्हणजे काँग्रेस पक्षाने आपली लाज सरेंडर केली आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनीसुद्धा आपल्या देशाच्या जमिनीवर कुणीही कब्जा केला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
चीनसोबत भारताचा सीमावाद आहे. मात्र आमच्या एक इंच जमिनीवरसुद्धा चीनने कब्जा केलेला नाही. जर चीनने कब्जा केलाच असेल तर तो सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मनावर केला आहे. २००८ मध्ये झालेल्या करारानंतर त्यांच्या डोक्यावर चीनचा कब्जा झाला आहे, अशी आम्हाला भीती वाटते, अशा टोला संबित पात्रा यांनी लगवला.
हमारे देश पर चीन ने कोई कब्जा नहीं किया है।
— BJP (@BJP4India) June 23, 2020
अगर कब्जा हुआ है मां-बेटे के मन पर 2008 के एमओयू के बाद शायद चीन का कब्जा हुआ है: डॉ @sambitswarajpic.twitter.com/cjC9DdbU0M
आपण रोज सकाळी पाहतोय की, काँग्रेस चीन प्रकरणावरून भारताविरोधात आक्रमक होत आहे, तसेच सरेंडर, सरेंडर बोलत आहे, त्यातून त्यांना आत्मशांती का मिळते, असा सवाल पात्रा यांनी उपस्थित केला. दरम्यान, आज सकाळी जेपी नड्डा यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर टीका केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी नड्डा यांच्यावर टीका केली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या