'बाबासाहेबांसमोर डोळे बंद करून प्रायश्चित पण करा, कारण...'; केंद्रीय कृषिमंत्र्यांनी राहुल गांधींना डिवचलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 13:25 IST2025-01-27T13:24:09+5:302025-01-27T13:25:59+5:30
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या मध्य प्रदेश दौऱ्यावर केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी निशाणा साधला आहे.

'बाबासाहेबांसमोर डोळे बंद करून प्रायश्चित पण करा, कारण...'; केंद्रीय कृषिमंत्र्यांनी राहुल गांधींना डिवचलं
Breaking news: केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी डॉ. बाबासाहेब आंबडेकरांचा उल्लेख करत काँग्रेसला लक्ष्य केले. महू दौऱ्यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना डिवचलं. 'भाजपने उभारलेलं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला भेट द्या आणि डोळे बंद करून प्रायश्चितही करा', अशा शब्दात चौहान यांनी गांधी आणि खरगेंना डिवचलं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, "मल्लिकार्जून खरगे आणि राहुल गांधी हे आज महू दौऱ्यावर येत आहेत. महूमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या जन्मस्थळी उभारलेले भव्य स्मारक जरूर बघा, जे भाजप सरकारने बनवले आहे."
चौहान म्हणाले, डोळे मिटून प्रायश्चित पण करा
केंद्रीय कृषिमंत्री पुढे म्हणाले की, "त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर डोळे बंद करून प्रायश्चित पण जरूर करावे, कारण तुम्ही आणि तुमच्या पक्षाने नेहमी बाबासाहेबांचा अपमान केला आहे. स्वातंत्र्यानंतर मध्य प्रदेशात अनेक दशके काँग्रेसचे सरकार होते, पण काँग्रेसने त्यांच्या जन्मस्थळी ना कोणताही कार्यक्रम आयोजित केला, ना कोणतेही स्मारक उभारण्याची कल्पना मांडली", अशी टीका शिवराज सिंह चौहान यांनी गांधी आणि खरगेंवर केली.
सत्तेत आल्यावर काँग्रेसने स्मारकाचे काम बंद केले -चौहान
"मध्य प्रदेशात जेव्हा भाजपचे सरकार आले, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री स्व.सुंदर लाल पटवाजींनी महूमध्ये स्मारकाचे भूमिपूजन केले. त्यानंतर काँग्रेस सरकार आले आणि काम बंद केले. पुन्हा भाजपचे सरकार आले आणि मी मुख्यमंत्री बनलो, तेव्हा आम्ही बाबासाहेबांच्या सन्मानार्थ भव्य दिव्य स्मारक उभारले", असे म्हणत चौहान यांनी काँग्रेसला लक्ष्य केले.
मल्लिकार्जुन खड़गे जी और राहुल गांधी जी आप आज महू आ रहे हैं। महू में भारतरत्न डॉ. भीमराव अंबेडकर जी की जन्मस्थली पर बने भव्य स्मारक को जरूर देखिए, जिसे भारतीय जनता पार्टी की सरकार ने बनवाया है।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) January 27, 2025
साथ ही बाबा साहब के स्मारक के सामने आंखे बंद करके प्रायश्चित भी जरूर कीजिए क्योंकि…
"मध्य प्रदेशात आता आंबेडकर महाकुंभाचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये बाबासाहेबांचे हजारो अनुयायी येतात. त्यांच्या राहण्याची आणि जेवणासह इतर सर्व व्यवस्था भाजप सरकार करते", असा टोलाही शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसला लगावला.