महागाईवर काँग्रेस आक्रमक; काळे कपडे घालून निदर्शने, राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 12:50 PM2022-08-05T12:50:16+5:302022-08-05T12:51:14+5:30

महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन सुरू आहे. सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचे सर्वच नेते निषेध नोंदवण्यासाठी काळे कपडे घालून आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Congress aggressive on inflation; agitation against BJP wearing black clothes, Rahul Gandhi in police custody | महागाईवर काँग्रेस आक्रमक; काळे कपडे घालून निदर्शने, राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात

महागाईवर काँग्रेस आक्रमक; काळे कपडे घालून निदर्शने, राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात

googlenewsNext

नवी दिल्ली: देशातील महागाईविरोधात काँग्रेसने देशभर निदर्शने सुरू केली आहेत. राजधानी दिल्लीतही काँग्रेसकडून महागाईविरोधात निदर्शने सुरू असताना पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ताब्यात घेतले. सध्या काँग्रेसचे अनेक खासदार विजय चौकात आंदोलनासाठी बसले आहेत. राहुल गांधी काँग्रेस खासदारांसह संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत पदयात्रा काढत होते. मात्र पोलिसांनी त्यांना विजय चौकातच रोखले आणि राहुलसह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले आहे. या मोर्चासाठी पोलिसांनी काँग्रेसला परवानगी दिली नव्हती. खबरदारी म्हणून सध्या या भागात कलम 144 लागू करण्यात आली आहे.


महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन सुरू आहे. सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचे सर्वच नेते निषेध नोंदवण्यासाठी काळे कपडे घालून आंदोलनात सहभागी झाले आहेत. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या की, 'देशातील महागाई अनियंत्रित झाली आहे. याबाबत सरकारने काही उपाय केले पाहिजे. महागाईविरोधात आम्ही ही लढाई लढत आहोत.' त्याचवेळी काँग्रेस नेते पी चिदंबरम म्हणाले की, 'हा विरोध महागाई आणि अग्निपथबाबत आहे. महागाईचा फटका सर्वांनाच बसला आहे. राजकीय पक्ष असल्याने जनतेचा आवाज बुलंद करणे हे आमचे कर्तव्य आहे, त्यामुळे आम्ही आंदोलन करत आहोत. 

फक्त जंतरमंतरवर आंदोलनाला परवानगी
दिल्ली पोलिसांनी काँग्रेसला पत्र लिहून जंतरमंतर वगळता संपूर्ण नवी दिल्लीत कलम 144 लागू असल्याचे सांगितले. अशा स्थितीत आंदोलनाला परवानगी देता येणार नाही. कलम 144 चे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. नवी दिल्ली क्षेत्राच्या डीसीपीने हे पत्र काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांना 4 ऑगस्ट आणि 2 ऑगस्टला लिहिले होते. माहितीसोबतच इशाराही देण्यात आला होता. तरीदेखील काँग्रेसने आंदोलन केल्यामुळे अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. विशेषत: पंतप्रधान निवासस्थान आणि सर्व व्हीव्हीआयपींच्या घराभोवती मोठा बंदोबस्त तैनात आहे.
 

Web Title: Congress aggressive on inflation; agitation against BJP wearing black clothes, Rahul Gandhi in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.