राहुल यांच्या ‘अझहर जी’वर काँग्रेसनं करून दिली रविशंकर यांच्या 'हाफिज जी'ची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 10:19 AM2019-03-12T10:19:13+5:302019-03-12T10:22:58+5:30

पुलवामा दहशतवाही दल्ला आणि बालाकोटमध्ये एअर स्ट्राइकनंतर राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय नेते उचलून धरत आहेत.

congress attacks bjp ravishankar prasad hafiz saeed video in reply to rahul masood comment | राहुल यांच्या ‘अझहर जी’वर काँग्रेसनं करून दिली रविशंकर यांच्या 'हाफिज जी'ची आठवण

राहुल यांच्या ‘अझहर जी’वर काँग्रेसनं करून दिली रविशंकर यांच्या 'हाफिज जी'ची आठवण

Next

नवी दिल्ली- पुलवामा दहशतवाही दल्ला आणि बालाकोटमध्ये एअर स्ट्राइकनंतर राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय नेते उचलून धरत आहेत. याच मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपाला घेरण्याच्या नादात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला 'जी' असं संबोधलं. त्यानंतर भाजपानं हा मुद्दा उचलून धरत राहुल गांधींवर निशाणा साधला. परंतु आता काँग्रेसनंही भाजपाला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदीनं यांनी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. ज्यात मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिज सईदला रविशंकर प्रसाद 'हाफिजजी' असं म्हणत असल्याचं पाहायला मिळतंय.

प्रियंका चतुर्वेदी ट्विटमध्ये लिहितात, मला आशा आहे की भाजपाच्या नव्या वेबसाइटवर या व्हिडीओला योग्य जागा मिळेल. भाजपा नेतृत्वाचंही हाफिज सईदला एक प्रकारे समर्थन होतं. भाजपानंच वेद प्रकाश वैदिक यांना हाफिज सईदची गळाभेट घेण्यासाठी पाठवलं होतं. तर प्रियंका यांनी दुसऱ्या एका शेअर केलेल्या फोटोमध्येही अजित डोवाल मसूद अझहरला सोडायला जात असतानाचं चित्र दाखवलं आहे.


भाजपावर टीका करण्याच्या नादात राहुल गांधींनी कुख्यात दहशतवादी आणि पुलवामा हल्ल्याचा मास्टर माइंड मसूद अझहर याचा उल्लेख मसूद अझहरजी असा केला. त्यामुळे भाजपावर निशाणा साधण्याच्या भरात राहुल गांधी स्वत:च अडचणीत सापडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राहुल गांधी यांनी काल दिल्लीमध्ये काँग्रेसच्या बुथ कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यावेळी पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. तसेच भाजपाच्या याआधीच्या सरकारनेच मसूद अझहरला सोडल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. मात्र यादरम्यान भाजपावर टीका करण्याचा भारात राहुल गांधी यांनी मसूद अजहर याचा उल्लेख मसूद अझहरजी असा केला. 

Web Title: congress attacks bjp ravishankar prasad hafiz saeed video in reply to rahul masood comment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.