काँग्रेसने केला बँक खाती गोठवल्याचा आरोप; आता BJP नेत्याने केला पलटवार, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 07:32 PM2024-02-16T19:32:19+5:302024-02-16T19:33:17+5:30

Congress Bank Account Frozen : आयकर विभागाने पक्षाची प्रमुख बँक खाती गोठवल्याचा आरोप काँग्रेसने शुक्रवारी केला.

Congress Bank Account Frozen : Congress accused of freezing bank accounts; Now the BJP leader hit back | काँग्रेसने केला बँक खाती गोठवल्याचा आरोप; आता BJP नेत्याने केला पलटवार, म्हणाले...

काँग्रेसने केला बँक खाती गोठवल्याचा आरोप; आता BJP नेत्याने केला पलटवार, म्हणाले...

Congress Bank Account Frozen : आयकर विभागाने पक्षाची प्रमुख बँक खाती गोठवल्याचा आरोप काँग्रेसने शुक्रवारी (दि.16) केला. पण, नंतर आयकर अपीलीय न्यायाधिकरणाने पुढील आठवड्यात सुनावणी होईपर्यंत खात्यांवरील बंदी उठवली. या प्रकरणावरुन काँग्रेसने भाजपावर टीका केली. बँक खाते गोठवण्याचे काम केंद्र सरकारच्या दबावाखाली करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला. आता यावर भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.

भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, काँग्रेसचे आरोप निराधार आहेत, याचा आम्ही निषेध करतो. काँग्रेस स्वतःसाठी पैशाची आणि भ्रष्टाचाराची चांगली व्यवस्था करते, पण हिशेब ठेवत नाही. ही नियमित आयकर प्रक्रिया आहे. कराची मागणी करण्यात आली होती, पण ते याविरोधात गेले. यामधील 20 टक्के रक्कम जमा करावी लागते. ही एक नियमित कर प्रक्रिया आहे.

राहुल गांधींचा उल्लेख 
रविशंकर प्रसाद पुढे म्हणाले, ही आयकर खात्याशी संबंधित बाब आहे, याचा भाजपशी काहीही संबंध नाही. जनतेनेच तुम्हाला मतदान न करण्याचा निर्णय घेतला असेल तर आम्ही काय करू शखतो? काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेला निघाले असले तरी त्यांची आघाडी तुटत चालली आहे, अशी बोचरी टाकाही त्यांनी यावेळी केली.

राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचा हल्लाबोल
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या प्रकरणावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. खरगे यांनी X वर पोस्ट केली, “सत्तेच्या नशेत असलेल्या मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाची खाती गोठवली, हा लोकशाहीला मोठा धक्का आहे. भाजपने जमा केलेला असंवैधानिक पैसा निवडणुकीत वापरला जाईल, पण आम्ही क्राउडफंडिंगद्वारे जमा केलेला पैसा सील केला जातोय. आम्ही न्यायव्यवस्थेला वाचवण्यासाठी आणि भारताची लोकशाही सुरक्षित करण्याचे आवाहन करतो. आम्ही रस्त्यावर उतरुन या अन्याय आणि हुकूमशाहीविरुद्ध जोरदार लढा देऊ."

राहुल गांधी यांनीही X पोस्टद्वारे केंद्रावर निशाणा साधला. “मोदीजी घाबरू नका, काँग्रेस पैशाच्या शक्तीचे नाही, तर लोकांच्या शक्तीचे नाव आहे. हुकूमशाहीपुढे आम्ही कधीही झुकलो नाही आणि झुकणारही नाही. भारताच्या लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता नखांनी लढेल."

Web Title: Congress Bank Account Frozen : Congress accused of freezing bank accounts; Now the BJP leader hit back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.