Congress Black Shirt Protest: विरोधकांचा संसद परिसरात ‘ब्लॅक मार्च’, काळे कपडे घालून भाजपचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 01:23 PM2023-03-27T13:23:56+5:302023-03-27T13:25:09+5:30
काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांनी काळे कपडे घालून संसद भवन ते विजय चौकापर्यंत निषेध रॅली काढली.
Congress Protest : गेल्या काही दिवसांपासून अदानी प्रकरणावरुन काँग्रेस (Congress) आणि भाजपमधील (BJP) संघर्ष तीव्र झाला आहे. यातच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना लोकसभेतून (Lok Sabha) अपात्र ठरवल्यानंतर संसदेपासून ते रस्त्यापर्यंत, काँग्रेसकडून विरोध व्यक्त होत आहे. सोमवारी काँग्रेससह विरोधी पक्षाचे खासदार काळे कपडे घालून रस्त्यावर उतरले. खासदारांनी संसद भवन ते विजय चौकापर्यंत निषेध रॅली काढली. या रॅलीमध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधीही (Sonia Gandhi) सहभागी झाल्या होत्या.
अडानी महाघोटाले और मोदी सरकार की तानाशाही के खिलाफ संयुक्त विपक्ष का संसद परिसर में गांधी प्रतिमा के सामने प्रदर्शन। pic.twitter.com/WSpWK7nEmO
— Congress (@INCIndia) March 27, 2023
देशात लोकशाही नष्ट होत असल्याने आज आम्ही काळे कपडे घालून निषेध नोंदवत आहोत, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) म्हणाले. राहुल गांधींच्या अपात्रतेविरोधात सर्वपक्षीयांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला आहे. निवडणुका जिंकून आलेल्या लोकांना सरकार धमक्या देत आहे. सरकारपुढे न झुकणाऱ्यांना ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवला जातो,' अशी टीका यावेळी खर्गेंनी केली.
मैं सभी पार्टियों के नेताओं का शुक्रिया अदा करता हूं, जिन्होंने कल कमजोर होते लोकतंत्र और राहुल जी को डिसक्वालीफाई किए जाने के विरोध में हमारा समर्थन किया।
— Congress (@INCIndia) March 27, 2023
: कांग्रेस अध्यक्ष व राज्यसभा में नेता प्रतिपक्ष श्री @khargepic.twitter.com/8at09jzOvN
खर्गे पुढे म्हणाले की, 'आज लोकशाहीचा काळा दिवस आहे. सरकार जेपीसीला का टाळत आहे? बहुमतात असताना जेपीसीमध्ये बहुतांश सदस्य त्यांच्याच पक्षाचे असतील, तरीही त्यांना भीती वाटते, याचा अर्थ काहीतरी चुकीचे घडत आहे. ज्यांना भीती वाटते, ते कधी ना कधी अडकणार आहेत. राहुल गांधी बोलले कर्नाटकातील कोलारमध्ये आणि खटला दाखल झाला गुजरातच्या सुरतमध्ये,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.