हत्तीवर स्वार होऊन काँग्रेस तीन राज्यांत शोधणार विजयाचा मार्ग   

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2018 08:27 AM2018-06-03T08:27:31+5:302018-06-03T08:27:31+5:30

एकजूट झालेल्या विरोधकांसमोर बलाढ्य भाजपाची दाणादाण उडत असल्याचे गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे आगामा काळात नरेंद्र मोदी आणि भाजपासमोर आव्हान उभे करण्यासाठी सर्व भाजपाविरोधी पक्षांची एकजूट करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.

Congress-BSP Alliance for three state Election | हत्तीवर स्वार होऊन काँग्रेस तीन राज्यांत शोधणार विजयाचा मार्ग   

हत्तीवर स्वार होऊन काँग्रेस तीन राज्यांत शोधणार विजयाचा मार्ग   

Next

नवी दिल्ली - एकजूट झालेल्या विरोधकांसमोर बलाढ्य भाजपाची दाणादाण उडत असल्याचे गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे आगामा काळात नरेंद्र मोदी आणि भाजपासमोर आव्हान उभे करण्यासाठी सर्व भाजपाविरोधी पक्षांची एकजूट करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे. त्याचाच भाग म्हणून या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यातील निवडणुकीमध्ये  काँग्रेस आणि बसपा एकत्र येऊन निवडणूर लढवण्याची शक्यता आहे.

या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेस बसपाला काही जागा सोडण्यासाठी तयार झाली आहे. तसेच जागावाटप आणि आघाडील अंतिम स्वरूप देण्याची जबाबदारी पक्षाने मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ, राजस्थानमध्ये अशोक गहलोत आणि छत्तीसगडमध्ये पी.एल. पुनिया यांच्याकडे सोपवली आहे. आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि बसपा प्रमुख मायावती यांच्या अंतिम सहमतीनंतर ही आघाडी मूर्त स्वरूपात येऊ शकेल.  


राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सध्या भाजपा सत्तेत आहे. मात्र यावेळी काँग्रेसकडून भाजपाला कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे. 2019 साली होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कर्नाटकमध्ये जनता दल सेक्युलर पक्षासोबत आघाडी करण्याची घोषणा काँग्रेसने आधीच केली आहे. दरम्यान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेस आणि बसपा हे  स्वतंत्रपणे निवडणूक लढवत होते. या राज्यांमध्ये 2013 साली झालेल्या निवडणुकीत अनेक मतदारसंघात काँग्रेस आणि बसपाने मिळवलेल्या मतांची बेरीज  भाजपापेक्षा अधिक होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवण्याचा विचार समोर आला आहे. जर दोन्ही पक्षांमध्ये आघाडी झाली तर पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि बसपा एकत्रितपणे लढतील. तसेच काँग्रेस आणि बसपामधील आघाडीचा परिणाम अन्य राज्यामधील निवडणुकीवरही पडेल. 


तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशमधील काँग्रेस आणि बसपाची आघाडी या तीन राज्यांत होणाऱ्या आघाडीवरच अवलंबून असेल. उत्तर प्रदेशमध्ये बसपा काँग्रेसच्या तुलनेत प्रबळ पक्ष आहे. त्यामुळे तीन राज्यांमध्ये काँग्रेसकडून आपला वाटा मिळवल्यानंतर उत्तर प्रदेशात काँग्रेसला रिटर्न गिफ्ट देण्याचा प्रयत्न असेल. मात्र याचदरम्यान, अपेक्षित जागा मिळाल्याशिवाय आघाडीत सहभागी होणार नाही, असे मायावती यांनी जाहीर केले आहे. 

Web Title: Congress-BSP Alliance for three state Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.