शेतकरी आत्महत्येची राहुल गांधीकडून दखल; मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 12:27 PM2019-06-01T12:27:45+5:302019-06-01T12:28:53+5:30

राहुल गांधी यांच्या वायनाड मतदार संघात एका शेतकऱ्यांने काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती. कर्जबाजीरपणा आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.

congress chief rahul gandhi urges kerala cm to help kin of farmer who killed self | शेतकरी आत्महत्येची राहुल गांधीकडून दखल; मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

शेतकरी आत्महत्येची राहुल गांधीकडून दखल; मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

Next

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर काँग्रेसमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी घेत पदाचा राजीनामा पक्षासमोर ठेवला. त्यांचा राजीनामा पक्षाने नाकारला असून अध्यक्षपदी राहण्याचा आग्रह केला आहे. या घडामोडी घडत असतानाच राहुल गांधी शेतकरी आत्महत्येवरून एक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे.

राहुल गांधी यांच्या वायनाड मतदार संघात एका शेतकऱ्यांने काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती. कर्जबाजीरपणा आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. वायनाडचे नवनिर्वाचित खासदार राहुल गांधी यांनी शेतकरी आत्महत्येची तातडीने दखल घेतली असून केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना पत्र पाठवून चौकशी करण्याची विनंती केली आहे. तसेच मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची देखील विनंती केली आहे.

राहुल यांनी पत्रात म्हटले की, वायनाड भागातील पनामारान पंचायत समितीतील नीरवरम गावात व्ही.डी. दिनेश कुमार यांनी आत्महत्या केल्याचे कळल्यानंतर दु:ख झाले'. राहुल यांनी मयत शेतकऱ्यांच्या पत्नीशी फोनवरून चर्चा केली. राहुल यांनी पत्रात म्हटले की, केरळमध्ये कुमार यांची आत्महत्या एकमेव नाही. अनेक शेतकरी मृत्याला कवटाळत आहेत. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांकडील कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांवर दबाव टाकण्यास ३१ डिसेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील वसुली एजंटकडून शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे.

राहुल यांनी शेतकरी आत्महत्येवर दीर्घकालीन तोडगा काढण्याची विनंती राहुल यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना केली आहे. नुकतीच झालेली लोकसभा निवडणुक राहुल यांनी वायनाडमधून लढवली आहे. त्यांनी ४ लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे.

Web Title: congress chief rahul gandhi urges kerala cm to help kin of farmer who killed self

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.