4 राज्यांत काँग्रेसचं सरकार, पण एकही OBC सचिव नाही; राहुल यांच्या त्या वक्तव्यावर भाजपचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 11:43 PM2023-09-20T23:43:11+5:302023-09-20T23:44:00+5:30
राहुल गांधींच्या या वक्तव्यावरून आता भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय पलटवार करत, काँग्रेस शासित राज्यांतील स्थितीसंदर्भात ट्विट केले आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान OBC आरक्षणावर भाष्य केले. यावेळी, त्यांनी दावा केला की, भारत सरकारमध्ये एकूण 90 सचिव आहेत. यांत केवळ तीन ओबीसी समुदायाचे आहेत आणि ते केवळ पाच टक्के बजेट नियंत्रित करतात. ते म्हणाले, "मी प्रश्न विचारला, जे 90 सचिव आहेत, जे भारत सरकार चालवतात. यांपैकी OBC किती आहेत? याच्या उत्तरानंतर मला आश्चर्य वाटले. कारण 90 पैकी केवळ 3 ओबीसी सचिव आहे." राहुल गांधींच्या या वक्तव्यावरून आता भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय पलटवार करत, काँग्रेस शासित राज्यांतील स्थितीसंदर्भात ट्विट केले आहे.
अमित मालवीय यांनी ट्विट करत म्हटले आहे, "काँग्रेसचे चार (राजस्थान, छतीसगड, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक) राज्यातं आजही सरकार आहे. मात्र, एकाही ठिकाणी ओबीसी चीफ सेक्रेटरी नाही. केवळ ज्ञानच देणार की काही करणारसुद्धा. तत्पूर्वी लोकसभेत अमित शाह यांनीही राहुल गांधीच्या वक्तव्यावर निशाणा साधला.
राहुल बाबा, कांग्रेस की चार (राजस्थान, छतीसगढ, हिमाचल प्रदेश और कर्नाटक) प्रदेशों में आज भी सरकार है लेकिन एक में भी ओबीसी चीफ सेक्रेटरी नहीं है।
— Amit Malviya (@amitmalviya) September 20, 2023
सिर्फ़ ज्ञान ही दोगे या कभी कुछ करोगे भी?
यावेळी राहुल गांधी म्हणाले, महिला आरक्षणात ओबीसी कोट्याशिवाय हे विधेयक अपूर्ण आहे. तसेच सत्ताधारी पक्ष जात जनगणनेच्या मागणीवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
अमित शाह यांनीही साधला निशाणा -
शाह म्हणाले, "सरकार कॅबिनेट चालवते. ते म्हणाले की, जे लोक देश चालवतात, त्यांत केवळ तीन ओबीसी आहेत. माझ्या मते देश सरकार चालवते. देशाचे धोरण कॅबिनेट, संसद ठरवते. जर आकडेच हवे असतील, तर सांगतो, भाजपमध्ये 29 टक्के खासदार ओबीसी आहेत. 85 खासदार ओबीसी आहेत. तुलना करायची असेल तर या. 29 मंत्री ओबीसी आहेत. आम्ही ओबीसीमधूनच पंतप्रधान दिला आहे."