राहुल गांधींसाठी काँग्रेस उतरली रस्त्यावर; देशभर सत्याग्रह, धरणे - रेल रोको

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 06:01 AM2023-03-27T06:01:23+5:302023-03-27T06:01:32+5:30

राजधानीत प्रियांकांच्या नेतृत्वात आंदाेलन

Congress hits the streets for Rahul Gandhi; Satyagraha all over the country | राहुल गांधींसाठी काँग्रेस उतरली रस्त्यावर; देशभर सत्याग्रह, धरणे - रेल रोको

राहुल गांधींसाठी काँग्रेस उतरली रस्त्यावर; देशभर सत्याग्रह, धरणे - रेल रोको

googlenewsNext

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभेतून अपात्र ठरवल्याच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रविवारी देशव्यापी ‘संकल्प सत्याग्रह’ केला. हिमाचल प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा आणि गुजरातसारख्या अनेक राज्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

गुजरातमध्ये पोलिसांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अमित चावडा यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. श्रीनगरमध्ये, जम्मू आणि काश्मीर प्रदेश काँग्रेस कमिटीचे (जेकेपीसीसी) माजी अध्यक्ष गुलाम अहमद मीर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एमए रोडवरील पक्षाच्या मुख्यालयासमोर निदर्शने केली. पंजाब आणि हरयाणातही ‘संकल्प सत्याग्रह’ करण्यात आला. राजस्थानमधील सत्ताधारी काँग्रेसने जयपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र सरकारच्या विरोधात सत्याग्रह केला.

शहीद पंतप्रधानांचा मुलगा देशाचा अपमान करू शकत नाही

माझ्या कुटुंबाने रक्त सांडून देशात लोकशाही जतन केली. लोकशाहीसाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. काँग्रेसच्या महान नेत्यांनी लोकशाहीचा पाया रचला. हा त्या पंतप्रधानांचा अपमान आहे, ज्यांनी आपले प्राण दिले. संसदेत पंतप्रधान विचारतात की, हे कुटुंब नेहरू आडनाव का वापरत नाही? तुम्ही संपूर्ण कुटुंबाचा व काश्मिरी पंडितांच्या परंपरेचा अपमान केला. आजपर्यंत त्यांनी आमच्या कुटुंबाचा अपमान केला, आम्ही गप्प होतो पण आता गप्प बसणार नाही.

राहुल गांधी यांनी ट्विटरवर अपडेट केले ‘अपात्र खासदार’ 
लोकसभेतून अपात्र ठरल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी ट्विटरवर आपली माहिती अपडेट करत स्वत:चे वर्णन ‘अपात्र खासदार’ असे केले. त्यांनी त्यांच्या अधिकृत वायनाड ट्विटर अकाउंटवर ‘अपात्र खासदार’ असे लिहिले.

मध्य प्रदेशात ‘रेल रोको’
मध्य प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत भुरिया यांना रविवारी भोपाळमधील कमलापती रेल्वे स्थानकावर ‘रेल रोको’ करण्यात आला. त्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली. 

Web Title: Congress hits the streets for Rahul Gandhi; Satyagraha all over the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.