'काँग्रेस भाजपची बी-टीम...', सपा प्रमुख अखिलेश यादव यांचा पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 07:34 PM2023-11-06T19:34:44+5:302023-11-06T19:35:50+5:30

विरोधकांच्या इंडिया आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव सातत्याने काँग्रेसवर टीका करत आहेत.

Congress is BJPs teamB, says akhilesh yadav, SP leader again targeted congress | 'काँग्रेस भाजपची बी-टीम...', सपा प्रमुख अखिलेश यादव यांचा पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा

'काँग्रेस भाजपची बी-टीम...', सपा प्रमुख अखिलेश यादव यांचा पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा

Congress vs Samajwadi Party: विरोधकांनी स्थापन केलेल्या INDIA आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) सातत्याने काँग्रेसवर (Congress) निशाणा साधत आहेत. अलीकडेच त्यांनी मध्य प्रदेशातील एका सभेतून काँग्रेसवर टीका केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

'काँग्रेसला समाजवादी पक्षाला त्याचा मित्र म्हणून नकोय. आज काँग्रेस आम आदमी पार्टीच्या विरोधातही बोलत आहे. काँग्रेसकडे छोट्या पक्षांना सोबत घेण्याची संधी होती. त्यांना वाटते की, जनता त्यांच्यासोबत आहे, परंतु पीडीए यावेळी त्यांना उत्तर देईल.' यावेळी अखिलेश यांनी काँग्रेसला भाजपची 'बी टीम' म्हटले. 

भाजपवरही टीका
अखिलेश यांनी यावेळी भाजपवरही टीका केली. काँग्रेस आणि भाजप पीडीए-मागास, दलित आणि आदिवासी वर्गांना आकर्षित करण्यासाठी जात जनगणना आणि आरक्षणावर भाष्य करत आहेत, परंतु काँग्रेसनेच जात जनगणना थांबवली आणि मंडल आयोगाचा अहवाल नाकारुन अंमलबजावणी करण्यास नकार दिला. भाजपही तोच मार्ग अवलंबत असल्याचे अखिलेश म्हणाले.

काँग्रेस कपटी पक्ष, मतदान करू नका
दरम्यान, रविवारी(दि.5) मध्य प्रदेशातील टिकमगड येथील रॅलीला संबोधित करताना अखिलेश यांनी काँग्रेसला कपटी पार्टी म्हणत, नागरिकांना काँग्रेसला मतदान न करण्याचे आवाहन केले. काँगग्रेस पक्षाबाबत नेहमी सावधगिरी बाळगा. ते आमचा विश्वासघात करू शकतात, मग तुम्ही त्यांच्यासाठी कोण आहात. काँग्रेसनेही जातीवर आधारित जनगणनेची मागणी सुरू केली, कारण त्यांची सर्व मते भाजपला गेली आहेत. ही मते परत मिळविण्यासाठी काँग्रेस जात जनगणनेची मागणी करत आहे, अशी टीका अखिलेश यादवांनी यावेळी केली होती.

Web Title: Congress is BJPs teamB, says akhilesh yadav, SP leader again targeted congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.