राहुल गांधी चपला झिजवतायत, अन् काँग्रेसचा नेता म्हणतोय 'भाजपला मत द्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 03:40 PM2022-11-07T15:40:15+5:302022-11-07T15:42:19+5:30

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. भाजप, काँग्रेस, आम आदमी पक्षाकडून जोरदार तयारी सुरू झाली असून प्रचारसभाही सुरू आहेत.

Congress leader in Gujarat Lalit Vasoya has urged people not to vote for Aam Aadmi Party and vote for BJP | राहुल गांधी चपला झिजवतायत, अन् काँग्रेसचा नेता म्हणतोय 'भाजपला मत द्या'

राहुल गांधी चपला झिजवतायत, अन् काँग्रेसचा नेता म्हणतोय 'भाजपला मत द्या'

Next

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. भाजप, काँग्रेस, आम आदमी पक्षाकडून जोरदार तयारी सुरू झाली असून प्रचारसभाही सुरू आहेत. यादरम्यान, गुजरातमधील काँग्रेस नेते ललित वासोया यांचे एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांनी एका सभेत भाजपला मत देण्याचे आवाहन केले आहे. 

ललित  यांनी भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. आम आदमी पक्षाला टाळण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.यासाठी तुम्हाला हवे असेल तर भाजपलाच मत द्या, असंही ते पुढे म्हणाले आहेत. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. बोलण्याच्या गोंधळात हे वक्तव्य झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि धोराजीचे आमदार ललित वसोसा जाहीर सभेत बोलत होते. काँग्रेससाठी मते मागत होते. यावेळी त्यांनी भाजपला मतदान करण्याबाबतही चर्चा केली. "आम आदमी पार्टी काँग्रेसची मतं वाटायला आली आहे. जर कोणी आम आदमी पक्षाबद्दल बोलले तर मी तुम्हाला मंचावरून सांगतो, भाजपला मत द्या, पण आम आदमी पक्षाला नाही." 

आम आदमी पार्टीचे केजरीवाल यांनी व्हिडिओ ट्विट केला आणि भाजप-काँग्रेस मिलीभगतच्या आपल्या जुन्या आरोपाचा पुनरुच्चार केला. केजरीवाल यांनी लिहिले की, हे बघा. भाजपला मत द्या, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सांगत आहेत. हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत, याबाबत शंका आहे का? दोघेही केवळ 'आप'च्या विरोधात आहेत, असं ट्विटमध्ये म्हटले आहे. 

गेल्या काही दिवसापासून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. केरळपासून सुरू झालेली यात्रा महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहोचली आहे. या पार्श्वभूमिवर काँग्रेसच्या नेत्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Web Title: Congress leader in Gujarat Lalit Vasoya has urged people not to vote for Aam Aadmi Party and vote for BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.