“राहुल गांधींना ज्येष्ठांशी कसं वागावं कळत नाही”; आणखी एका बड्या नेत्याचा काँग्रेसला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 01:42 PM2022-08-28T13:42:22+5:302022-08-28T13:43:25+5:30

राहुल गांधींच्या धोरणांमुळे काँग्रेसची वाताहात झाली असून, त्यांची विचारसरणी पक्षाील ब्लॉक ते बूथ पातळीपर्यंत कुणाशीच जुळत नाही, अशी घणाघाती टीका करत बड्या नेत्याने राजीनामा दिला.

congress leader m a khan resign and said things started going downhill after rahul gandhi handled post of vp of party committee | “राहुल गांधींना ज्येष्ठांशी कसं वागावं कळत नाही”; आणखी एका बड्या नेत्याचा काँग्रेसला रामराम

“राहुल गांधींना ज्येष्ठांशी कसं वागावं कळत नाही”; आणखी एका बड्या नेत्याचा काँग्रेसला रामराम

Next

नवी दिल्ली: महाराष्ट्रात एकीकडे शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष तीव्र होत असताना दुसरीकडे काँग्रेसला राष्ट्रीय स्तरावर मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. गुलाम नबी आझाद यांनी केलेल्या आरोपांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच काँग्रेसला पुन्हा एक धक्का बसला आहे. राहुल गांधींवर हल्लाबोल करत काँग्रेसच्या आणखी एका बड्या नेत्याने पक्षाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. 

राहुल गांधींच्या नेतृत्वावर टीका करत पक्षाच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्याने राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, गुलाम नबी आझाद यांनी मांडलेल्या मुद्द्यांचाच पुनरुच्चार त्यांनी राजीनामा देताना केला आहे. राहुल गांधींची एक वेगळीच विचारसरणी असून ती पक्षाच्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांनी जुळत नसल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. तेलंगणामधील काँग्रेसचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते एम. ए. खान यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडत राजीनामा दिला आहे. 

राहुल गांधींना ज्येष्ठांशी कसे वागावे ते कळत नाही

राहुल गांधींच्या धोरणांचा परिणाम म्हणून काँग्रेसची वाताहत झाली आहे. पक्ष अशा पातळीला येऊन पोहोचला आहे. जिथे गेली अनेक दशके पक्ष उभारणीचे काम केलेले ज्येष्ठ नेतेच पक्षाला सोडून जात आहेत. ज्येष्ठांशी कसे वागायचे, हे राहुल गांधींना माहिती नाही, अशी घणाघाती टीका खान यांनी केली. तसेच राहुल गांधींनी पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा कारभार सांभाळल्यापासून परिस्थिती अधिकच खराब होत गेली आहे. राहुल गांधींकडे त्यांची अशी एक वेगळीच विचारसरणी आहे. पण ती विचारसरणी पक्षातल्या ब्लॉक पातळीपासून बूथ पातळीपर्यंत कुणाशीच जुळत नाही, अशी टीकाही खान यांनी केली आहे. 

दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून नवीन पक्ष काढणार असल्याची घोषणा केली. राहुल गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर आणि खासकरुन जानेवारी २०१३ मध्ये त्यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर याआधी असलेली सल्लागार यंत्रणा पूर्णपणे नष्ट करण्यात आली. तसेच पक्षाच्या अनुभवी नेत्यांना बाजूला सारुन कोणताही अनुभव नसणारे पक्षाचे कामकाज चालवू लागले. राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांसमोर सरकारी अध्यादेश फाडला हे फारच बालिशपणाचे होते. २०१४ च्या निवडणुकीत झालेल्या पराभवात याचा मोठा वाटा होता, असा दावा गुलाम नबी आझाद यांनी केला.
 

Web Title: congress leader m a khan resign and said things started going downhill after rahul gandhi handled post of vp of party committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.