Lingayatism: कर्नाटकात राहुल गांधींनी घेतली लिंगायत पंथाची दीक्षा, पुढच्या वर्षी राज्यात होणार आहेत निवडणुका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 04:43 PM2022-08-03T16:43:10+5:302022-08-03T16:43:34+5:30
लिंगायत पंथ अथवा संप्रदाय हा संत बसवन्ना यांच्या सिद्धांतांवर चालणारा एक पंथ आहे. यात कुठल्याही धर्माच्या व्यक्तीला लिंगायत पंथ स्वीकारण्याचे स्वातंत्र्य आहे.
काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज लिंगायत पंथाची दीक्षा घेतली. कर्नाटकमधील चित्रदुर्गा येथे लिंगायत पंथाचा एक प्रसिद्ध मठ आहे. हा मठ मुरुगा मठ नावानेही ओळखला जातो. राहुल गांधी यांनी आज येथे मठाचे प्रमुख डॉ शिवमूर्ती मुरूगा शरणरू स्वामी यांची भेट घेतली. यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या उपस्थितीत मठाच्या मुख्यांनी त्यांना इष्टलिंग दीक्षा दीली आणि नियमाप्रमाणे, त्यांच्या डोक्यावर भभूताचे त्रिपुण्ड लावले.
राहुल गांधी यांना इष्टलिंग दीक्षा दिली जात असताना, मठाच्या वतीने, राहुल गांधी लिंगायत पंथाची दीक्षा घेत आहेत, हा एक एतिहासिक क्षण आहे, अशी घोषणाही करण्यात आली.
लिंगायत पंथ अथवा संप्रदाय म्हणजे? -
लिंगायत पंथ अथवा संप्रदाय हा संत बसवन्ना यांच्या सिद्धांतांवर चालणारा एक पंथ आहे. यात कुठल्याही धर्माच्या व्यक्तीला लिंगायत पंथ स्वीकारण्याचे स्वातंत्र्य आहे. या प्रक्रियेअंतर्गत इष्टलिंग दीक्षा ग्रहण करणाऱ्यांना लिंगायत पंथाचे मानले जाते.
कशा प्रकारे स्वीकारला जातो लिंगायत पंथ? -
इष्टलिंग दीक्ष प्रक्रियेंतर्गत लिंगायत संत मंत्रोचारासह लिंगायत संप्रदाय स्वाकारणाऱ्या व्यक्तीस ईष्टलिंग धारण करायला सांगतात. यानंतर संबंधित व्यक्तीने लिंगायत पंथाचा स्वीकार केला असे मानले जाते. इष्टलिंग दीक्षा घेतल्यानंतर, राहुल गांधी यांनी ट्विट केले, की आपण ईष्टलिंग दीक्षा घेतली आहे, आपण भाग्यशाली आहोत आणि संत बसवन्ना यांच्यासंदर्भात आणखी जाणून घेण्याची आणि वाचण्यासाठी अत्यंत उत्सुक आहोत.
कर्नाटकच्या निवडणुका तोंडावर -
महत्वाचे म्हणजे, कर्नाटकात 2023 मध्ये निवडणुका होणार आहेत. येथे लिंगायत पंथाचा मोठा प्रभाव आहे. तसेच कर्नाटकमध्ये लिंगायत पंथ हा भाजपची मोठी व्होट बँक आहे.