भारत-चीन मुद्द्यावर राजकारण तापलं; राहुल गांधींनी मोदी सरकारला विचारले 'हे' 3 प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 08:38 PM2021-02-12T20:38:23+5:302021-02-12T20:40:25+5:30
LAC वरील डिसएंगेजमेन्टवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर संरक्षण मंत्रालयाकडून शुक्रवारी निवेदन जारी करण्यात आले. यानंतर, आता राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा डिसएंगेजमेन्टवरून केंद्र सरकारला तीन प्रश्न करत उत्तर मागितले आहे. (India-China issue )
नवी दिल्ली - प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) पेंगाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण भागांतून भारत आणि चिनने आपले सैन्य मागे घेतल्यानंतर राजकारण तापले आहे. या डिसएंगेजमेन्टवरून (disengagement) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर संरक्षण मंत्रालयाकडून शुक्रवारी निवेदन जारी करण्यात आले. यानंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनीही राहुल गांधींवर पलटवार करत निशाना साधला. यातच, आता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा डिसएंगेजमेन्टवरून केंद्र सरकारला तीन प्रश्न करत उत्तर मागितले आहे. (Rahul Gandhi asks 3 questions from Modi government on lac disengagement)
राहुल गांधींचे 3 प्रश्न -
1 - आपल्या जवानांना कैलास रेन्जमधील स्ट्राँग पॉझिशनवरून माघारी का बोलावले जात आहे?
2 - आपण आपला भू-भाग का देत आहोत आणि जवानांना फिंगर 4 वरून फिंगर 3 वर का आणत आहोत?
3 - चीनने देपसांग प्लेन्स आणि गोगरा हॉट स्प्रिंग्सवरून सैनिकांना मागे का बोलावले नाही?
राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यावर सरकारचा पलटवार; केंद्रीय मंत्री म्हणाले 'कुंदबुद्धी' पप्पू
GOI must explain-
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 12, 2021
1. Why our forces are withdrawing from dominant positions in Kailash Ranges?
2. Why we are ceding our territory & withdrawing from forward base at Finger 4 to Finger 3?
3. Why has China not withdrawn from our territory in Depsang Plains & Gogra Hot Springs?
जेपी नड्डांचा राहुल गांधींवर निशाणा -
एलएसीवरील डिसएंगेजमेन्ट संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवरून भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शुक्रवारी जबरदस्त पलटवार केला. नड्डा म्हणाले, या डिसएंगेजमेन्ट प्रक्रियेत सरकारकडून भारतीय जमीन देण्यात आलेली नाही. एवढेच नाही, तर त्यांनी एक व्हिडिओ डॉक्यूमेंट्री ट्विट करत, “जर कुणी हजारो वर्ग किलेमिटर जमीन सोडण्याचे पाप केले असेल तर, तो एका भ्रष्ट, भ्याड वंश आहे, ज्याने देशातील आपली शक्ती कायम ठेवण्यासाठी तोडला,” असे म्हटले आहे.
भारताची जमीन कोणी चीनला दिली, हे राहुल गांधींनी आजोबांना विचारावं; भाजपचा पलटवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरट, चीनचा सामना करू शकले नाही -
तत्पूर्वी, भारत आणि चीन सीमेवरून समेट झाल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरट असून, ते चीनचा सामना करू शकले नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. यावर भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधींवर पलटवार केला.
...राहुल गांधी यांनी आपल्या आजोबांना विचारावे -
भारताची जमीन चीनला कोणी दिली? हे राहुल गांधी यांनी आपले आजोबा, म्हणजेच देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना विचारावे. राहुल गांधींना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळेल. कोण देशभक्त आहे आणि कोण नाही, हेही राहुल गांधीना समजेल. जनतेला सर्व काही माहिती आहे, अशा शब्दात केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांना प्रत्युत्तर दिले आहे.
रणदीप सिंह सुरजेवाला होणार भाजपत सामील? या मोठ्या नेत्यानं दिली ऑफर
कुंदबुद्धी पप्पू -
याच मुद्द्यावर, केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, "कुंदबुद्धी पप्पू जींच्या कमालीचा कुठलाही रस्ता नाही. दुसरीकडून सुपारी घेऊन देशाला बदनाम करण्याचे षड्यंत्र आणि संरक्षण दलाचे मनोबल तोडण्याच्या प्रयत्नात लागले आहेत. त्यावर काही उपचार नाही."