'त्यांना विचारा रेल्वे अपघात का झाला... ते म्हणतील ५० वर्षांपूर्वी काँग्रेसने 'हे' केलं होतं; राहुल गांधींचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 09:38 AM2023-06-05T09:38:55+5:302023-06-05T09:39:36+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये अनिवासी भारतीयांना संबोधित केले.
Odisha Train Accident : बालासोर येथे रेल्वेच्या झालेल्या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला. मालगाडी तीन रेल्वेगाड्यांना झालेल्या भीषण अपघातात मरण पावलेल्यांची संख्या २८८ वर पोहोचली असून ११७५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. यावर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी म्हणाले, 'तुम्ही मोदी सरकारला काहीही विचाराल, ते मागे बघतील. त्यांना विचारा रेल्वे अपघात का झाला? ते म्हणतील पहा काँग्रेसने हे ५० वर्षांपूर्वी केले होते. ओडिशात शुक्रवारी झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला आहे.
राहुल गांधी अमेरिकेतील वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होऊन मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. सोमवारी त्यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये अनिवासी भारतीयांना संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. मोदी सरकारला विचारा की तुम्ही पाठ्यपुस्तकातून पीरियोडिक टेबल का काढला? ते लगेच म्हणतील की काँग्रेसने हे ६० वर्षांपूर्वी केले होते.
राहुल गांधी म्हणाले, मोदी सरकार लगेच उत्तर देतात की, मागे वळून पहा. आता विचार करावा लागेल. तुम्ही सर्व कारने इथे आला आहात का. कल्पना करा की कार चालवताना तुम्ही फक्त मागील आरशात पाहिले तर काय होईल? तुम्ही गाडी चालवू शकाल का? तुमचे एकामागून एक अपघात होत असतील. प्रवासी तुम्हाला विचारतील तुम्ही काय करत आहात?, असंही राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले, ही पंतप्रधान मोदींची विचारसरणी आहे. त्यांना भारताची गाडी चालवायची आहे, पण ते फक्त मागे वळून पाहतात. गाडी पुढे का सरकत नाही, पुन्हा पुन्हा का धक्के मारत आहे, याचा विचार त्यांना करता येत नाही. ही भाजप आणि संघाची विचारसरणी आहे. तुम्ही मंत्री आणि पंतप्रधान बोलताना ऐका, ते फक्त इतिहासावर बोलतात. भविष्याबद्दल कोणी बोलत नाही. ते फक्त इतिहासासाठी लोकांना जबाबदार धरत आहेत.
'भारतात वेगवेगळ्या विचारधारांची लढाई आहे. एक भाजपचा आणि एक काँग्रेसचा, एकीकडे नथुराम गोडसेची विचारसरणी आहे आणि दुसरीकडे महात्मा गांधींची विचारधारा पुढे नेत आहोत. त्यावेळी अमेरिकेपेक्षा मोठी शक्ती असलेल्या ब्रिटिशांशी गांधीजींनी युद्ध केले. तुम्ही लोक गांधी, आंबेडकर, पटेल, नेहरू यांच्या पावलावर पाऊल टाकत आहात, असंही राहुल गांधी म्हणाले.