‘राज्यसभेत पहिल्यांदाच खासदारांना मारहाण करण्यात आली!' राहुल गांधींनी सरकारवर केले 'हे' गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 01:55 PM2021-08-12T13:55:47+5:302021-08-12T13:58:20+5:30
यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोप केला की, राज्यसभेत पहिल्यांदाच खासदारांना मारहाण करण्यात आली, बाहेरून लोकांना बोलावले गेले आणि खासदारांसोबत धक्का-बुक्की करण्यात आली. सभापतीची जबाबदारी सभागृह चालवण्याची असते. विरोधकांची बाजू सभागृहात का ठेवू शकत नाही? (Rahul gandhi attacks modi government)
नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर विरोधी पक्षांनी गुरुवारी संयुक्त मोर्चा काढला. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात डझनहून अधिक राजकीय पक्ष सहभागी झाले होते. यावेळी राहुल गांधी यांनी सरकारवर गंभीर आरोप केले, तसेच सभागृहात खासदारांसोबत गैरवर्तन झाल्याचेही ते म्हणाले. (Congress Leader Rahul gandhi attacks modi government parliament opposition march rajya sabha)
यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोप केला की, राज्यसभेत पहिल्यांदाच खासदारांना मारहाण करण्यात आली, बाहेरून लोकांना बोलावले गेले आणि खासदारांसोबत धक्का-बुक्की करण्यात आली. सभापतीची जबाबदारी सभागृह चालवण्याची असते. विरोधकांची बाजू सभागृहात का ठेवू शकत नाही?
राहुल गांधी म्हणाले, देशाचे पंतप्रधान आज देश विकण्याचे काम करत आहेत. देशाचा आत्मा दोन-तीन उद्योगपतींना विकला जात आहे. विरोधक संसदेत काहीही बोलू शकत नाहीत. देशातील 60 टक्के लोकांचा आवाज दाबला जात आहे, राज्यसभेत खासदारांशी गैरवर्तन करण्यात आले. आम्ही सरकारसोबत पेगासस मुद्द्यावर चर्चा करण्यासंदर्भात बोललो, आम्ही शेतकरी आणि महागाईचा मुद्दा उचलला. तसेच, ही लोकशाहीची हत्या आहे. असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
जंतर-मंतरवर राहुल गांधी -
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी दिल्लीतील जंतर -मंतरवरही भाषण केले. यावेळी, आज देशात संविधानावर हल्ला होत आहे. नोटाबंदी-जीएसटी लागू करून नरेंद्र मोदी यांनी लघु उद्योग नष्ट केले, ते शेतकऱ्यांवर अत्याचार करतात, देशाच्या संसदेत प्रथमच खासदारांना मारहाण करण्यात आली, असे आरोपही राहुल गांधी यांनी केले.
विरोधी पक्षांची पत्रकार परिषद -
विरोधी पक्षांच्या पक्षकार परिषदेत बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, राज्यसभेत काल मार्शल लॉ लावण्यात आला, असे वाटत होते, की आम्ही पाकिस्तानच्या सीमेवर उभे आहोत. सरकार रोजच्या रोज लोकशाहीची हत्या करत आहे. आम्ही या सरकारविरोधात लढत राहू. याशिवाय राजदचे मनोज झा, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि इतर विरोधी नेत्यांनीही सरकारवर हल्ला चढवत गंभीर आरोप केले.
वाद पेटला! राहुल गांधींच्या ट्विटर अकाऊंटनंतर आता काँग्रेसचंही अकाऊंट लॉक