मोदीजी, ...तर आपल्याला एकत्र लढायचं आहे अन् चीनला उचलून बाहेर फेकायचं आहे; राहुल गांधींचं मोदींना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 04:51 PM2020-06-26T16:51:58+5:302020-06-26T17:28:43+5:30

राहुल गांधी यांनी ट्विटरवर, ‘प्रधानमंत्री जी, देश आपसे सच सुनना चाहता है।’ असे कॅप्शन देत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. याला त्यांनी #SpeakUpForOurJawans असा हॅशटॅगही दिला आहे. 

congress leader rahul gandhi attacks on pm narendra modi on india china border issue | मोदीजी, ...तर आपल्याला एकत्र लढायचं आहे अन् चीनला उचलून बाहेर फेकायचं आहे; राहुल गांधींचं मोदींना आवाहन

मोदीजी, ...तर आपल्याला एकत्र लढायचं आहे अन् चीनला उचलून बाहेर फेकायचं आहे; राहुल गांधींचं मोदींना आवाहन

Next
ठळक मुद्देलडाखच्या गलवान खोऱ्यात भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले. तेव्हापासून सीमेवरील तणाव अधिक वाढला आहे. संपूर्ण देश एक होऊन, भारतीय सैन्याबरोबर आणि सरकारबरोबर उभा आहे - राहुल गांधीमहत्वाचे म्हणजे, एका नव्हे, तर तीन ठिकाणी चीनने आपला भूभाग बळकावला आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चीन मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधाला आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यात भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले. तेव्हापासून सीमेवरील तणाव अधिक वाढला आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी शुक्रवारी एक व्हिडिओ जारी करत, पंतप्रधानांनी न घाबरता खरे सांगावे, की चीनने जमीन घेतली आहे आणि आम्ही कारवाई करणार आहोत. अशा स्थितीत संपूर्ण देश आपल्यासोबत आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटरवर, ‘प्रधानमंत्री जी, देश आपसे सच सुनना चाहता है।’ असे कॅप्शन देत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. याला त्यांनी #SpeakUpForOurJawans असा हॅशटॅगही दिला आहे. 

या व्हिडिओमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे, की “संपूर्ण देश एक होऊन, भारतीय सैन्याबरोबर आणि सरकारबरोबर उभा आहे. मात्र एक महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. काही दिवसांपूर्वी आपले पंतप्रधान म्हणाले होते, की भारताची एक इंच जमीनही कुणी घेतलेली नाही. कोणीही भारताच्या हद्दीत आलेले नही. मात्र, उपग्रहांनी काढलेल्या फोटोंमध्ये दिसत आहे, लडाखमधील लोक सांगत आहेत. एवढेच नाही, तर लष्कारातील निवृत्त जनरलही सांगत आहेत, की चीनने आपला भूभाग घेतला आहे. महत्वाचे म्हणजे, एका नव्हे, तर तीन ठिकाणी चीनने आपला भूभाग बळकावला आहे." 

"पंतप्रधनजी आपल्याला खरे सांगावेच लागेल, घाबरण्याची आश्यकता नाही. जर आपण म्हणालात, की चीनने जमीन घेतली नाही आणि ती घेतलेली असेल, तर चीनचा फायदा होईल. आपल्याला त्यांच्याविरोधात एकत्र लढायचे आहे. त्यांना उचलून बाहेर फेकायचे आहे." असेही राहुल गांधी यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

याच व्हिडिओमध्ये, “आपल्या वीर जवानांना शस्त्राशिवाय सीमेवर का पाठवण्यात आले आणि कुणी पाठवले?,” असा प्रश्नही राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या -

India China Tension : चीनचा सामना करण्यासाठी 'भीष्म' मैदानात, 'ही' आहे 'खासियत'

...तर इतर रेजिमेंटचे जवान सीमेवर तंबाखू मळत होते का?; मोदींच्या 'त्या' वक्तव्यावर शिवसेनाचा हल्लाबोल

चीनच्या दादागिरीला भारताचं चोख उत्तर, टक्कर देण्यासाठी तयार केलं जबरदस्त 'चक्रव्यूह'

मोदी सरकारच्या 'या' निर्णयामुळे चीनला झोंबली मिर्ची; ...तर अमेरिका अन् रशियाही कामी येणार नाही, भारताला दिली धमकी

फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला!

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

Web Title: congress leader rahul gandhi attacks on pm narendra modi on india china border issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.