मी शेतकऱ्यांना जाणतो, ते मागे हटणार नाहीत; सरकारलाच माघार घ्यावी लागेल : राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 04:37 PM2021-02-03T16:37:13+5:302021-02-03T16:45:31+5:30
सरकारकडून शेतकऱ्यांवर अत्याचार होत असल्याचा राहुल गांधींचा आरोप
काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलन, तसंच अर्थसंकल्पावर भाष्य करत सरकारवर टीकेचा बाण सोडला. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी यावर लवकरच तोडगा काढण्यात आला पाहिजे असं मत व्यक्त केलं. शेतकरी हा देशाचा कणा आहेत आणि सरकार त्यांच्यावर अत्याचार करत असल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केली.
"शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तटबंदी तयार करण्यात आली आहे. हे शेतकऱ्यांना घाबरतात का?," असा सवालही राहुल गांधी यांनी यावेळी केला. "शेतकरी ही देशाची ताकद आहे. केंद्र सरकारचं काम शेतकऱ्यांशी चर्चा करणं आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण करणं हे आहे. आज दिल्लीला शेतकऱ्यांचा वेढा आहे. का दिल्लीला आज तटबंदी घालण्यात येत आहे?," असंही ते म्हणाले.
Delhi is surrounded by farmers. They're the people who give us sustenance. Why is Delhi being converted into a fortress? Why are we threatening, beating & killing them? Why is Govt not talking to them & not resolving this problem? This problem isn't good for country: Rahul Gandhi pic.twitter.com/rHBlTrhHPJ
— ANI (@ANI) February 3, 2021
"सरकार या समस्येचं निराकरण का करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की ऑफर टेबलवर आहे. हा कायदा दोन वर्षांसाठी थांबवला जाऊ शकतो. या समस्येचं निराकरण केलं गेलं पाहिजे. मी शेतकऱ्यांना चांगलं ओळखतो. ते मागे हटणार नाहीत, सरकारचा मागे हटावं लागेल," असंही राहुल गांधी यांनी नमूद केलं.
शेतकऱ्यांना धमकावण्याचं काम
"सरकार शेतकऱ्यांना घाबरवण्याचं, धमकावण्याचं काम हे सरकारचं नाही. शेतकऱ्यांशी चर्चा करून त्याचं निराकरण करणं हे त्यांचं काम आहे, सरकार शेतकऱ्यांशी चर्चा का करत नाही. ही समस्या आपल्या देशासाठी चांगली नाही. शेतकरी कुठेच जात नाहीत," असंही ते म्हणाले.
I had expected from the Budget that Govt will provide support to 99% of India's population. But this Budget is that of the 1% population. You snatched away money from people in small & medium industry, workers, farmers, Forces & put it in the pockets of 5-10 people: Rahul Gandhi pic.twitter.com/CSNrBShLgA
— ANI (@ANI) February 3, 2021
अर्थसंकल्पावही टीका
"हा अर्थसंकल्प देशाच्या एक टक्का इतक्या लोकसंख्येचा आहे. जनतेच्या हाती पैसा देण्याची गरज आहे. चीन बाबतही सरकारची भूमिका स्पष्ट नाही. चीन भारताची जमिन बळकावतो आणि तुम्ही अर्थसंकल्प वाढवणार नाही असा संदेश देता. आपण आपल्या लष्कराला सहकार्य करणार नाही का? ही कोणती देशभक्ती आहे? थंडीत लष्कर देशाच्या सीमेचं रक्षण करत आहे आणि तुम्ही त्यांना पैसेही देत नाही," असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.