'केंद्रात भाजपचा पराभव करायचा असेल तर केसीआर...', राहुल गांधींनी तेलंगणात साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 06:46 PM2023-11-28T18:46:59+5:302023-11-28T18:48:23+5:30

बीआरएस, भारतीय जनता पक्ष आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएम एकत्र काम करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी आज केला.

Congress leader Rahul Gandhi criticized Prime Minister Narendra Modi at a campaign rally in Telangana | 'केंद्रात भाजपचा पराभव करायचा असेल तर केसीआर...', राहुल गांधींनी तेलंगणात साधला निशाणा

'केंद्रात भाजपचा पराभव करायचा असेल तर केसीआर...', राहुल गांधींनी तेलंगणात साधला निशाणा

दिल्लीत नरेंद्र मोदींचा पराभव करायचा असेल तर तेलंगणात के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय समितीचा पराभव करणे आवश्यक आहे, असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केले. हैदराबादमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी बीआरएस, भारतीय जनता पार्टी आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएम एकत्र काम करत असल्याचा आरोप केला. केसीआर यांनी संसदेत मोदी सरकारचे समर्थन केले होते. केसीआर यांच्यावर काही खटला आहे का, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. 

अन्... आंतरराष्ट्रीय ख्यातीचा टनेल एक्स्पर्ट बाबा बौख नाग देवतेसमोर नतमस्तक झाला

राहुल गांधी म्हणाले की, ते सर्वात भ्रष्ट सरकार चालवतात. ईडी, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) आणि प्राप्तिकर विभाग यांसारख्या केंद्रीय एजन्सी केसीआर यांच्या मागे का नाहीत, असा सवालही खासदार राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी म्हणाले की, ते पंतप्रधानांशी लढत असल्याने, त्यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या राज्यांमध्ये २४ खटले नोंदवले आहेत आणि न्यायालये त्यांना वेळोवेळी समन्स पाठवतात. मला पहिल्यांदाच बदनामीप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा झाली. माझे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. माझे सरकारी घर हिसकावून घेतले. मी म्हणालो मला ते नको आहे. देशातील करोडो गरीब जनतेच्या हृदयात माझे घर आहे, असंही गांधी म्हणाले.

"मी आणि माझी बहीण तेलंगणासाठी दिल्लीत सैनिक आहोत, तुम्हाला काही हवे असेल तर मला आणि माझ्या बहिणीला आदेश द्या, आम्ही उपस्थित राहू. तेलंगणातील लोकांसाठी जे काही करता येईल ते आम्ही करू. कारण जेव्हा इंदिरा गांधीजींना गरज होती तेव्हा तेलंगणातील जनतेने त्यांना साथ दिली आणि मदत केली. हे आम्ही कधीच विसरू शकत नाही, असंही राहुल गांधी म्हणाले. 

ओवेसी यांच्यावरही टीका 

ईडी आणि सीबीआय सारख्या एजन्सी नेहमीच आपल्या मागे असतात असा दावा करत राहुल गांधी यांनी ओवेसी यांच्यामागे कोणती एजन्सी आहे का असा सवाल केला. "ओवेसी यांच्यावर एकही खटला का नाही, असा प्रश्न पडतो, आणि उत्तर म्हणजे एआयएमआयएमचे अध्यक्ष मोदींना मदत करतात. काँग्रेसला नुकसान पोहोचवण्यासाठी आणि भाजपला मदत करण्यासाठी एआयएमआयएम विविध राज्यात आपले उमेदवार उभे करत आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

Web Title: Congress leader Rahul Gandhi criticized Prime Minister Narendra Modi at a campaign rally in Telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.