National Herald Case : तीन दिवसांत ३० तास चौकशी, शुक्रवारी राहुल गांधींना पुन्हा ईडीसमोर हजर राहावं लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 11:15 PM2022-06-15T23:15:32+5:302022-06-15T23:16:01+5:30

National Herald Case : सोनिया गांधी यांनादेखील ईडीनं २३ जून रोजी हजर राहण्यास सांगितलं आहे. परंतु सध्या सोनिया गांधी या दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल आहेत.

congress leader rahul gandhi ed enquiry live and latest updates national herald case ed priyanka gandhi | National Herald Case : तीन दिवसांत ३० तास चौकशी, शुक्रवारी राहुल गांधींना पुन्हा ईडीसमोर हजर राहावं लागणार

National Herald Case : तीन दिवसांत ३० तास चौकशी, शुक्रवारी राहुल गांधींना पुन्हा ईडीसमोर हजर राहावं लागणार

googlenewsNext

National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी सलग तिसऱ्या दिवशी सक्तवसूली संचलनालयानं राहुल गांधी यांची चौकशी केली. तिसऱ्या दिवशीही त्यांची जवळपास आठ तास चौकशी करण्यात आली. राहुल गांधी रात्री साडेनऊच्या सुमारास एपीजे अब्दुल कलाम रोड येथे असलेल्या ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. तीन दिवसांमध्ये तब्बल तीस तास राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली.

राहुल गांधी यांना शुक्रवारी पुन्हा एकदा ईडीनं चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. बुधवारी त्यांना त्यांच्या यंग इंडियामधील हिस्स्याशी निगजीत डॉक्युमेंट्सच्या आधारावर प्रश्न विचारण्यात आले. ईडीद्वारे त्यांना जवळपास ३५ प्रश्न विचारण्यात आले. सकाळी साडेअकराच्या सुमारास राहुल गांधी चौकशीसाठी ईडीच्या मुख्यालयात पोहोचले होते.


कार्यकर्ते हिंसक झाले
दरम्यान, राहुल गांधींची चौकशी राजकीय सुडभावनेतून केली जात असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत आंदोलन केलं. बुधवारी आंदोलनादरम्यान काँग्रेसचे कार्यकर्ते हिंसक झाले आणि काही जणांनी टायर जाळून निषेध नोंदवला. तर काही कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स तोडले. 

८०० जण ताब्यात
दिल्ली पोलिसांचे विशेष कायदा आणि सुव्यवस्था डीपी हुड्डा म्हणाले की, काही ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते आले आहेत, आम्ही सांगूनही काही लोकांनी ऐकले नाही. विविध ठिकाणांहून १५० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, तीन दिवसांत आतापर्यंत सुमारे ८०० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Web Title: congress leader rahul gandhi ed enquiry live and latest updates national herald case ed priyanka gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.