राहुल गांधींनी कार्यकर्त्याला दिलं कुत्र्यानं न खाल्लेलं बिस्किट? भाजपचा दावा, शेअर केला VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 12:56 PM2024-02-06T12:56:27+5:302024-02-06T12:58:30+5:30
यापूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावरही कार्यकर्त्यांसंदर्भात अपमानास्पद भाष्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भाजपने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी कुत्र्याला दिलेले बिस्किट कार्यकर्त्यांला दिले, असे भाजपने म्हटले आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओदेखील भाजपने शेअर केला आहे. यापूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावरही कार्यकर्त्यांसंदर्भात अपमानास्पद भाष्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
काय होतं संपूर्ण प्रकरण -
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, 'काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष खर्गे जी यांनी पक्षाच्या बूथ एजंटची तुलना कुत्र्यासोबत केली होती आणि इकडे राहुल गांधी त्यांच्या दौऱ्यात एका कुत्र्याला बिस्किट देत आहेत. मात्र कुत्र्याने ते बिस्किट खाल्ले नाही, यानंतर त्यांनी तेच बिस्किट त्यांच्या एका कार्यकर्त्याला दिली.'
एवढेच नाही तर, "ज्या पक्षाचा अध्यक्ष आणि युवराज आपल्या कार्यकर्त्यांसोबत कुत्र्यासारखा व्यवहार करत असतील तर, असा पक्ष लुप्त होणे स्वाभाविक आहे."
अभी कुछ दिन पहले कांग्रेस अध्यक्ष खड़गे जी ने पार्टी के बूथ एजेंटों की तुलना कुत्तों से की और यहाँ राहुल गांधी अपनी यात्रा में एक कुत्ते को बिस्किट खिला रहे हैं और जब कुत्ते ने नहीं खाया तो वही बिस्किट उन्होंने अपने कार्यकर्ता को दे दिया।
— Amit Malviya (@amitmalviya) February 5, 2024
जिस पार्टी का अध्यक्ष और युवराज अपने… pic.twitter.com/70Mn2TEHrx
खर्गेंवर काँग्रेस नेत्यानंच साधला निशाणा -
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा एक व्हिडिओ शेअर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, 'कार्यकर्ता कुत्रा नसतो, कर्मठ आणि कर्मवीर असतो. माननीय अध्यक्ष जी, हे कडवे नक्की आहे, पण सत्य आहे.' महत्वाचे म्हणजे, त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेलेली पोस्ट खर्गेंशिवाय वायनाडचे खासदार राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनाही टॅग केले आहे.