'त्या' मुलींना भेटलो आणि...; राहुल गांधींनी स्वेटर न वापरण्याचे सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 04:29 PM2023-01-10T16:29:03+5:302023-01-10T16:29:49+5:30
१०० हून दिवसांपासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वात यात्रा सुरू आहे.
गेल्या १०० हून दिवसांपासून काँग्रेसचीभारत जोडो यात्रा सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वात यात्रा सुरू आहे. सध्या भारत जोडा यात्रा उत्तर प्रदेशमधून पुढे गेली आहे. दिल्लीसह उत्तर प्रदेशमध्ये थंडीचे प्रमाण जास्त आहे, तरीही राहुल गांधी फक्त एका टी शर्टवरती आहेत. यावरुन चर्चा सुरू झाल्या आहेत. एवढ्या थंडीतही राहुल गांधी स्वेटर का वापरत नाहीत, यावरुन विरोधकांनी टीकाही केली. आज या संदर्भात स्वत: राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
एका मुलाखतीमध्ये राहुल गांधी यांनी स्वेटर न वापरण्याचे कारण सांगितले आहे. 'मध्यप्रदेशमध्ये मी काही मुलींना भेटलो. या मुलींना भेटल्यानंतर मी भारत जोडो यात्रेत स्वेटर न वापरण्याचे ठरवले. यात्रेत फक्त टी शर्ट वापरण्याचे मी ठरवले, असंही राहुल गांधी म्हणाले.
'मी केरळपासासून यात्रा सुरू केली. ज्यावेळी यात्रा सुरू केली तेव्हा गरमी होती. यात्रा मध्यप्रदेशमध्ये आली तेव्हा थंडी सुरू झाली. त्या ठिकाणी मला एक दिवस तीन मुली भेटल्या, या मुलींना माझ्यासोबत फोटो काढायचा होता. त्यांचे फाटलेले कपडे होते, जेव्हा त्यांनी गळाभेट केली तेव्हा ते थंडीने कापत होते.तेव्हाच मी ठरवले, जोपर्यंत त्या मुलींना स्वेटर मिळत नाही तोपर्यंत मी स्वेटर वापरणार नाही, फक्त टी शर्ट वापरणार, असं राहुल गांधी म्हणाले.
हो मी उपटसुंभ, पवार कुटुंब उपटून टाकणार; गोपीचंद पडळकरांचा अजित पवारांवर पलटवार
भारत जोडो यात्रेवरुन राहुल गांधी यांच्यावर भाजप नेत्यांनी टीका सुरु आहेत. या यात्रेची सुरुवात कन्याकुमारीपासून झाली, पुढ ही यात्रा कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आता ही यात्रा उत्तर प्रदेशमधून पंजाबकडे पोहोचली आहे.