"आम्हाला हवं ते बोला, पण...", पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला राहुल गांधींचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 03:03 PM2023-07-25T15:03:11+5:302023-07-25T15:03:34+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'इंडिया'वरून विरोधकांवर टीका केल्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले आहे.

 Congress leader Rahul Gandhi has responded to Prime Minister Narendra Modi's criticism over india alliance | "आम्हाला हवं ते बोला, पण...", पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला राहुल गांधींचे प्रत्युत्तर

"आम्हाला हवं ते बोला, पण...", पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला राहुल गांधींचे प्रत्युत्तर

googlenewsNext

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'इंडिया'वरून विरोधकांवर टीका केल्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. "तुम्हाला हवं ते आम्हाला बोला मिस्टर मोदी पण आम्ही भारत आहोत", असे गांधींनी म्हटले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूरमधील हिंसा आणि क्रूरता यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आघाडीवर सडकून टीका केली. या टीकेला आता राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिले आहे. 

राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "तुम्हाला हवं ते आम्हाला बोला मिस्टर मोदी पण आम्ही भारत आहोत. आम्ही मणिपूरमधील परिस्थिती ठिक करण्यासाठी मदत करू आणि प्रत्येक स्त्री आणि मुलाचे अश्रू पुसू. आम्ही तेथील सर्व लोकांसाठी प्रेम आणि शांती परत आणू. तसेच आम्ही मणिपूरमध्ये भारताच्या कल्पनेची पुनर्बांधणी करू."

मोदी काय म्हणाले?
विरोधकांच्या 'इंडिया' या आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोचरी टीका केली. "केवळ 'इंडिया' नाव ठेवल्यानं काही होत नाही. ईस्ट इंडिया कंपनीनेही 'इंडिया' लावले होते आणि इंडियन मुजाहिदीनच्या नावातही 'इंडिया' आहे. विरोधक विखुरलेले आहेत. हताश आहेत. त्यांना आणखी बराच काळ सत्तेत येण्याची इच्छा नाही, असे त्यांचा दृष्टीकोन पाहता दिसते", अशा शब्दांत मोदींनी विरोधकांचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी १५ ऑगस्टला प्रत्येक घरावर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचीही माहिती दिली. या पावसाळी अधिवेशन काळातील ही संसदीय पक्षाची पहिलीच बैठक होती. ही बैठक संसदेच्या लायब्ररी बिल्डिंगमध्ये पार पडली. यावेळी गृह मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते.

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूरमधील घटनेवरून गदारोळ सुरू आहे. या मुद्द्यावर पंतप्रधान मोदीनी बोलावे आणि संसदेत सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधक करत आहेत. तर, गृहमंत्री अमित शाह यांच्या उत्तराने सरकार अल्पकालीन चर्चेसाठी तयार आहे. मात्र या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी बोलावे, यावर विरोधक ठाम आहेत.
 

Web Title:  Congress leader Rahul Gandhi has responded to Prime Minister Narendra Modi's criticism over india alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.