काँग्रेस तयार करणार सोशल मीडिया वॉरियर्स टीम, व्हिडिओ जारी करत राहुल गांधींनी केलं असं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 07:28 PM2021-02-08T19:28:41+5:302021-02-08T19:31:13+5:30
रोहन गुप्ता म्हणाले, लोकशाही संस्थांना दाबले जात आहे. तसेच सरकारविरोधी आवाज उचलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, याला उत्तर देणे आणि देश वाचविणे ही काँग्रेसची जबाबदारी आहे. (Rahul Gandhi)
नवी दिल्ली -काँग्रेसनेसोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगली पकड मिळविण्यासाठी कवायत सुरू केली आहे. यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकांना सोशल मिडिया वॉरियर्स टीम जॉइन करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी टोल फ्री नंबरदेखील जारी केला आहे. व्हॉट्सअॅप, वेबसाईट आणि ईमेलच्या सहाय्यानेही या टीमचा भाग होता येऊ शकते. (Congress Leader Rahul Gandhi message join the social media warrior team)
सोशल मिडिया वॉरियर्स टीमसंदर्भात राहुल गांधी म्हणाले, ही टीम न्यायासाठी लढणाऱ्या योद्ध्यांची आहे. ही द्वेश भावना ठेवणारी सेना नाही. ही हिंसाचार करणारी सेना नाही. ही सत्याची सेना आहे (army of truth). ही सेना भारताच्या विचारांचे रक्षण करेल.
India needs non violent warriors to fight for truth, compassion & harmony. You are central to defending the idea of India.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 8, 2021
Come, #JoinCongressSocialMedia in this fight.
India needs you! pic.twitter.com/DhBsHMKU22
पक्षाचे वरिष्ठ नेते पवन कुमार बंसल, प्रवक्ते पवन खेडा आणि पक्षाचे सोशल मिडिया प्रमुख रोहन गुप्ता यांनी सोमवारी या अभियानाला सुरुवात केली. बंसल म्हणाले, प्रत्येक शहरातून 5 लाख सोशल मीडिया वॉरियर्स तयार करण्याचे या अभियानाचे लक्ष्य आहे. यांच्या माध्यमाने देशासमोरील मुद्दे उचलले जातील. तसेच या योद्ध्यांच्या माध्यमाने विचार आणि सिद्धांतांवर चर्चा होईल.
रोहन गुप्ता म्हणाले, लोकशाही संस्थांना दाबले जात आहे. तसेच सरकारविरोधी आवाज उचलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, याला उत्तर देणे आणि देश वाचविणे ही काँग्रेसची जबाबदारी आहे.
तसेच, ते म्हणाले, की आम्ही शांत बसू शकत नाही. देशाचा आवाज उचलणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. यामुळेच आम्ही या अभियानाला सुरुवात करत आहोत. हे अभियान आम्ही एक महिना चालवणार आहोत. जेनेकरून लोक या अभियानाशी जोडले जातील.