'UCC संदर्भात कुणीही बोलू नका, जोवर...', राहुल गांधी यांची काँग्रेस नेत्यांना सूचना!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 01:06 AM2023-07-14T01:06:15+5:302023-07-14T01:06:48+5:30
"धामी सरकारचे UCC संदर्भातील भाष्य हा केवळ ध्रुवीकरणाचा प्रयत्न आहे. यात अडकण्याऐवजी स्थानीय मुद्द्यांवर काम करायचे आहे."
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनीही रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तराखंडमधील काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांसोबत बोलताना, UCC हे ध्रुवीकरणाचे राजकारण असल्याचे सांगत, स्थानिक मुद्द्यांवर काम करण्यास सल्ला दिला आहे.
राहुल गांधी म्हणाले, युनिफॉर्म सिव्हिल कोडवर सरकारचा ड्राफ्ट बघितल्याशिवाय, कुठल्या प्रकारचे भाष्य करायचे नाही. धामी सरकारचे UCC संदर्भातील भाष्य हा केवळ ध्रुवीकरणाचा प्रयत्न आहे. यात अडकण्याऐवजी स्थानीय मुद्द्यांवर काम करायचे आहे. या बैठकीत अग्निवीर योजनेसंदर्भातही भाजपला घेरण्यासंदर्भात चर्चा झाली. तसेच, राज्यातील सैन्य भरतीची स्थिती पाहून अग्निवीर योजनेला जोरदार विरोध करायचा आहे, असेही बैठकीत सांगण्यात आले.
पदयात्रा काढून लोकांचे लक्ष वेधणार राहुल-प्रियांका -
यानंतर, सर्वांनी राहुल गांधी यांचे भारत जोडो यात्रेबद्दल अभनंद केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल म्हणाले, केवळ रणनिती आखून उपयोग नाही. ती जमिनीवर उतरवावी लागेल. यासाठी जनतेत जावे लागेल. यासाठी आपल्याला सर्वांनासुद्धा पदयात्रा काढाव्या लागतील. यानंतर, ठरलेल्या मुद्द्यांवर संपूर्ण राज्यात पदयात्रा काढल्या जातील. तसेच यात राहुल गांधी आणि प्रिंयांकाही सहभागी होती, असे ठरले.