आठ चित्ते तर आले, पण आठ वर्षांत १६ कोटी रोजगार का नाही आले?, राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 07:51 PM2022-09-17T19:51:41+5:302022-09-17T19:52:00+5:30
भारतातून १९५२ साली नामशेष झालेले चित्ते तब्बल ७० वर्षांनंतर भारतात परतले आहेत.
भारतातून १९५२ साली नामशेष झालेले चित्ते तब्बल ७० वर्षांनंतर भारतात परतले आहेत. मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून ८ चित्ते आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्याच हस्ते या चित्त्यांना अभयारण्यात सोडण्यात आलं. चित्त्यांनी भारतात पाऊल ठेवल्यानंतरचे खास क्षण यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या कॅमेरामध्ये टिपले. तसंच हा दिवस देशासाठी ऐतिहासिक दिवस असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मात्र मोदींवर निशाणा साधला.
चित्त्यांच्या भारतात येण्यावरूनही आता राजकारण सुरू झालं आहे. भारत जोडो यात्रेवर असलेल्या राहुल गांधी यांनी ट्वीट करत पंतप्रधान आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. “आठ चित्ते तर आले, पण आता हे सांगा ८ वर्षांमध्ये १६ कोटी रोजगार का नाही आले?,” असा सवाल त्यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसनं शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणूनही साजरा केला.
8 चीते तो आ गए, अब ये बताइए,
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 17, 2022
8 सालों में 16 करोड़ रोज़गार क्यों नहीं आए?
युवाओं की है ललकार, ले कर रहेंगे रोज़गार।#राष्ट्रीय_बेरोजगार_दिवसpic.twitter.com/QEFUF90lkm
कायम्हणालेहोतेमोदी ?
"हे दुर्दैव आहे की आपण १९५२ मध्ये देशातून चित्ते नामशेष झाल्याचं घोषित केलं, परंतु अनेक दशकांपासून त्यांच्या पुनर्वसनासाठी कोणतेही अर्थपूर्ण प्रयत्न केले गेले नाहीत. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आता देशात नव्या ऊर्जेने चित्त्यांचे पुनर्वसन होऊ लागलं आहे. निसर्ग आणि पर्यावरणाचं रक्षण झालं की आपले भविष्यही सुरक्षित असतं हे खरं आहे. विकासाचे आणि समृद्धीचे मार्गही खुले होतात. कुनो नॅशनल पार्कमध्ये जेव्हा चित्ते पुन्हा धावतील, तेव्हा येथील गवताळ प्रदेशाची परिसंस्था पुन्हा पूर्ववत होईल", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.