महाराष्ट्रात आम्ही 'डिसीजन मेकर' नाही; राहुल गांधींनीही सांगितली (पृथ्वी)राज की बात!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 02:54 PM2020-05-26T14:54:22+5:302020-05-26T15:22:06+5:30
यापूर्वी, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका अशाच प्रकारच्या वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात, ‘मी मंत्रिमंडळात नाही. सरकारपण आमचे नाही. हे सरकार शिवसेनेचे आहे,’ असे चव्हान यांनी म्हटले होते.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरस आणि देशात सुरू असलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारे वक्तव्य केले आहे." आमचा महाराष्ट्र सरकारला केवळ पाठिंबा आहे. आम्ही तेथील 'डिसीजन मेकर' नाही," असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
यापूर्वी, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका अशाच प्रकारच्या वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात, ‘मी मंत्रिमंडळात नाही. सरकारपण आमचे नाही. हे सरकार शिवसेनेचे आहे,’ असे चव्हान यांनी म्हटले होते.
मोदी सरकारचे शक्तीशाली चीनला 30 दिवसांत 3 मोठे धक्के, संपूर्ण जगच गेलंय 'ड्रॅगन'च्या विरोधात
यावेळी एका पत्रकाराने महाराष्ट्रातील सध्यस्थितीचा उल्लेख करत राहुल गांधी यांना प्रश्न केला होता, की देशातील अक तृतियांश कोरोनाबाधित महाराष्ट्रात आहेत. तेथील सरकारमध्ये तुम्ही सहभागी आहात. मुंबईत महाराष्ट्राच्या आर्ध्याहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रानेही राज्यात लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे वाटते का? कारण तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही चर्चा सुरू झाली आहे.
जाणून घ्या; पॉझिटिव्ह रुग्णांपासून 'किती ते किती दिवसांपर्यंत' पसरतो कोरोना? संशोधनाचा मोठा दावा
पत्रकाराने विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, देशातील दिल्ली, मुंबई आणि पुणे यांसारख्या मोस्ट कनेक्टेड शहरांमध्येच कोरोना वाढत आहे, असे आपल्याला दिसून येईल. मी आपल्याला एक फरक सांगू इच्छितो, की आमचा महाराष्ट्र सरकारला केवळ पाठिंबा आहे. मात्र, आम्ही तेथील 'डिसिजन मेकर' नाही. आम्ही पंजाब, छत्तीसगड, राजस्थान आणि पदुच्चेरी येथे डिसिजन मेकर आहोत. हा सरकार चालवण्यामधला आणि सरकारला पाठिंबा असण्यामधील फरक आहे. तथापी, महाराष्ट्र त्याच्या कनेक्टिव्हिटीमुळे संघर्ष कारत आहे. मुंबई देशातील एक आर्थिक दृष्ट्या महत्वाचे शहर आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मुंबईला पूर्ण ताकदीनिशी सहकार्य करायला हवे. मला जाणीव आहे, की महाराष्ट्र एक अत्यंत कठीन लढाई लढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील जनतेला पूर्ण तागदीनिशी सहकार्य करणे आवश्यक आहे."
Watch my LIVE video press conference on the Covid crisis, the Lockdown & other related issues. https://t.co/6O83YiAPXX
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 26, 2020
आम्हाला माहिती आहे, पुढे काय करायला हवे -
काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांसंदर्भात बोलताना राहुल गांधी म्हणाले, आमचे सरकार गरिबांना पैसे आणि भोजन देत आहे. आम्हाला माहिती आहे, की पुढे काय करायला हवे. पण राज्ये किती काळ एकटेच लढाई लढतील. केंद्रालाही पुढे यावे लागेल आणि नियोजनासंदर्भात देशाशी बोलावे लागेल.
आता सरकार पुढे काय करणार? -
पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले होते, की आपण 21 दिवसांत कोरोना व्हायरसवर मात करू, मात्र आता 60 दिवस झाले आहेत. आता तर देशभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. लॉकडाउनही काढला जात आहे. लॉकडाउनचा हेतू पूर्णपणे फेल गेला आहे. आता सरकार पुढे काय करणार ? असा सवालही राहुल गांधी यांनी विचारला आहे.