राहुल गांधी यांची कोलारमधील सभा तिसऱ्यांदा पुढे ढकलली; कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 10:06 AM2023-04-08T10:06:06+5:302023-04-08T11:05:58+5:30
कोलारधून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना उमेदवारी देण्यावरून काँग्रेसमध्ये चर्चा सुरु आहे.
कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला गेला आहे. यातच ज्या कोलारमधून राहुल गांधींनी मोदींविरोधी वक्तव्य केलेले, त्या वक्तव्यावरून राहुल यांची खासदारकी गेली आहे. यामुळे राहुल गांधी त्याच कोलारमधून कर्नाटकात प्रचाराची सुरुवात करणार होते. परंतू, काही कारणास्तव तिसऱ्यांदा राहुल यांची कोलारमधील सभा स्थगित करण्यात आली आहे.
कोलारधून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना उमेदवारी देण्यावरून काँग्रेसमध्ये चर्चा सुरु आहे. याचा अखेरचा निर्णय राहुल गांधी घेतील,असे कर्नाटकच्या नेत्यांनी म्हटले होते. कदाचित हे कारण असण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांची १० एप्रिलला कोलारमध्ये सभा होणार होती. राहुल गांधी यांची पहिली सभा अनेक अर्थांनी खास असणार होती. ते आधी ५ एप्रिलला सभा घेणार होते. परंतू ती पुढे ढकलून ९ एप्रिल करण्यात आली होती. ती पुन्हा पुढे ढकलून १० एप्रिल करण्यात आली. आता ती १६ एप्रिल करण्यात आली आहे. कोलार हे तेच ठिकाण आहे जिथे राहुल गांधींनी मोदी आडनावावरून टिप्पणी केली होती. या टिप्पणीमुळेच त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.
राहुल गांधींनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास नकार दिला आहे. त्यानंतर, न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि शुक्रवारी त्यांना लोकसभेसाठी अपात्र ठरवण्यात आले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. १८ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारवर टीका केली होती.
कर्नाटक निवडणूक...
कर्नाटकातील सर्व २२४ विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात १० मे रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर १३ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहेत