काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल, भारत जोडो यात्रेतून प्रियांका गांधी परतल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 07:01 PM2023-01-04T19:01:28+5:302023-01-04T19:02:23+5:30

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल केले आहे. या संदर्भात रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी माहिती दिली.

congress leader sonia gandhi admitted to hospital priyanka gandhi leaves bharat jodo yatra | काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल, भारत जोडो यात्रेतून प्रियांका गांधी परतल्या

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल, भारत जोडो यात्रेतून प्रियांका गांधी परतल्या

Next

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल केले आहे. या संदर्भात रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी माहिती दिली. 'यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज आमच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्हायरल रेस्पीरेटरी इन्फेक्शनवर देखरेख आणि उपचारांसाठी त्यांना दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ.स्वरुप यांनी दिली. दरम्यान, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी या राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेतून परतल्या आहेत.

प्रियांका गांधी रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. मंगळवारपासून सोनिया गांधींची प्रकृती खराब होती, त्यामुळे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या 'भारत जोडो यात्रेतून परत आले होते. काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' आज सकाळी 6 वाजता बागपतमधील मावी कलान येथून पुन्हा सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रियांका गांधी बुधवारी राहुल गांधींसोबत पदयात्रेत सहभागी झाल्या नाहीत.

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा सकाळी दिल्लीहून मावी कलान येथे पोहोचले आणि पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार सकाळी 6 वाजल्यापासून यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली. पण आज सकाळी प्रियांका गांधी यात्रेत सहभागी झालेल्या नाहीत, असं काँग्रेसच्या उत्तर प्रदेश युनिटचे प्रवक्ते अंशू अवस्थी म्हणाले.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा मंगळवारी दुपारी गाझियाबाद येथील लोनी बॉर्डरपासून उत्तर प्रदेशमध्ये दाखल झाली होती. ही यात्रा गुरुवारी हरियाणासाठी रवाना होईल. 

...म्हणून काँग्रेसचे मित्रपक्षही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेपासून राहताहेत चार हात दूर, समोर येतंय धक्कादायक कारण 

मंगळवारी सकाळी दिल्लीच्या काश्मिरी गेट येथून काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने रवाना झाले होते. भारत जोडो यात्रेच्या गाझियाबादच्या लोणी सीमेवरून उत्तर प्रदेशात प्रवेश करताना राहुल आणि प्रियांका गांधी मंगळवारी सात किलोमीटर चालत दिल्लीला परतले. 

ही यात्रा सुमारे तीन दिवस उत्तर प्रदेशात राहणार असून त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी हरियाणातील पानिपतमध्ये प्रवेश करणार आहे. यानंतर, पंजाबमार्गे, एक दिवस हिमाचल प्रदेशातून जाईल आणि नंतर जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश करेल, जिथे तो संपेल.

Web Title: congress leader sonia gandhi admitted to hospital priyanka gandhi leaves bharat jodo yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.