वडेट्टीवार यांना काँग्रेस नेतृत्वाची फटकार; दिल्लीत केले पाचारण, राहुल गांधी यांच्याबाबत केले होते वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 03:11 PM2023-10-14T15:11:07+5:302023-10-14T15:13:05+5:30

विजय वडेट्टीवार यांनी के. सी. वेणुगोपाल यांच्या कक्षात पाऊल ठेवताच के. सी. वेणुगोपाल संतप्त होत म्हणाले की, काय वक्तव्य करीत आहात? राहुल गांधी यांच्याबाबत काय बोलला आहात?

Congress leadership reprimands vadettiwar; Called in Delhi, statements were made about Rahul Gandhi | वडेट्टीवार यांना काँग्रेस नेतृत्वाची फटकार; दिल्लीत केले पाचारण, राहुल गांधी यांच्याबाबत केले होते वक्तव्य

वडेट्टीवार यांना काँग्रेस नेतृत्वाची फटकार; दिल्लीत केले पाचारण, राहुल गांधी यांच्याबाबत केले होते वक्तव्य

आदेश रावल -

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना काँग्रेस नेतृत्वाने फटकारले आहे. त्यांना काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिल्लीत पाचारण केले होते.

विजय वडेट्टीवार यांनी के. सी. वेणुगोपाल यांच्या कक्षात पाऊल ठेवताच के. सी. वेणुगोपाल संतप्त होत म्हणाले की, काय वक्तव्य करीत आहात? राहुल गांधी यांच्याबाबत काय बोलला आहात? त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी तत्काळ स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली. वडेट्टीवार यांच्याबरोबर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हेही होते.

वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणाच्या अनेक क्लिप बरोबर नेल्या होत्या. त्यांनी सांगितले की, मी राहुल नार्वेकर यांच्याबाबत बोलू इच्छित होतो; परंतु चुकीने राहुल गांधी यांचे नाव आले. वडेट्टीवार यांनी राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याची माहिती काँग्रेस नेतृत्वापर्यंत पोहोचली होती. ही बाब पक्ष नेतृत्वाला आवडली नाही. त्यामुळे वडेट्टीवार यांना दिल्लीत पाचारण केले आणि फटकारले.

Web Title: Congress leadership reprimands vadettiwar; Called in Delhi, statements were made about Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.