"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 04:43 PM2024-10-10T16:43:15+5:302024-10-10T16:45:28+5:30

Haryana Assembly Election Result 2024: काँग्रेसचे नेते आणि लोकसभेमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हरयाणातील पराभवाबाबत आपलं परखड मत पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या पक्षाच्या उच्चस्तरीय बैठकीत मांडल्याचं वृत्त आहे.

"Congress lost in Haryana because of these leaders", angered Rahul Gandhi expressed his opinion on the defeat.  | "या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 

"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 

हरयाणामध्ये सत्ता येणारच याबाबत ठाम विश्वास असलेल्या काँग्रेसला हरयाणात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे जबरदस्त धक्का बसला आहे. एकीकडे काँग्रेसचे नेते हा निकाल आपल्याला मान्य नसल्याचे सांगत शंका उपस्थित करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते आणि लोकसभेमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हरयाणातील पराभवाबाबत आपलं परखड मत पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या पक्षाच्या उच्चस्तरीय बैठकीत मांडल्याचं वृत्त आहे. राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांमुळे पक्षाचा पराभव झाल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. मात्र त्यांनी कुठल्याही नेत्याचं नाव घेतलेलं नाही.

हरयाणामधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांचं विश्लेषण करण्यासाठी काँग्रेसकडून बोलावण्यात आलेल्या बैठकीत राहुल गांधी यांनी सांगितले की, हरयाणामध्ये नेत्यांचे हितसंबंध वर राहिले. तर पक्षाच्या हिताला महत्त्व दिलं गेलं नाही, यावेळी राहुल गांधी यांनी कुठल्या नेत्याचं नाव घेतलं नाही. मात्र राज्यात नेमका कुणामुळे पराभव झाला याचे संकेत दिले.

दरम्यान, हरयाणामध्ये झालेल्या अनपेक्षित पराभवाचं विश्लेषण करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. हरणायामधील नेत्यांसोबत हे विश्लेषण केलं जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज हरयाणाशी संबंधित अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीमध्ये मतमोजणीमध्ये आढळलेली अनियमितता आणि हरयाणा काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांबाबत चर्चा झाली. आता राज्यातील नेत्यासोबत होणाऱ्या बैठकीनंतर या प्रकरणी कारवाई केली जाणार आहे. हरयाणा निवडणुकीशी संबंधित वरिष्ठ निरीक्षकांनी मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधींकडे हरयाणाबाबतच्या प्राथमिक अहवालातून ही माहिती दिली आहे.

हरयाणमधील निकालांबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, वेणुगोपाल, अजय माकन आणि अशोक गहलोत यांनी चर्चा केली. तसेच निकालांचं अध्ययन करण्यासाठी तथ्य शोधक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. ही समिती काँग्रेसचे उमेदवार आणि नेत्यांना भेटून आपला अहवाल काँग्रेसच्या अध्यक्षांकडे सुपुर्द करणार आहे.  

Web Title: "Congress lost in Haryana because of these leaders", angered Rahul Gandhi expressed his opinion on the defeat. 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.