गोवा, कर्नाटकनंतर राजकीय वादळ मध्य प्रदेशात जाणार? काँग्रेस नेते चिंतेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 10:36 AM2019-07-15T10:36:23+5:302019-07-15T10:37:05+5:30

भाजपा गेल्या 7 महिन्यांपासून स्वप्न बघत आहे. जे अद्याप साकार झालं नाही असा टोला मंत्री प्रदीप जयस्वाल यांनी भाजपाला लगावला आहे. 

As the Congress in Madhya Pradesh is fearing a Karnataka-like situation in state | गोवा, कर्नाटकनंतर राजकीय वादळ मध्य प्रदेशात जाणार? काँग्रेस नेते चिंतेत 

गोवा, कर्नाटकनंतर राजकीय वादळ मध्य प्रदेशात जाणार? काँग्रेस नेते चिंतेत 

Next

भोपाळ - कर्नाटक आणि गोव्यानंतर भाजपाच्या निशाण्यावर मध्य प्रदेश सरकार आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. भाजपा नेत्यांकडून तसे संकेत मिळत असले तरी काँग्रेसकडून विरोधी पक्ष स्वप्न बघत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र खबरदारी म्हणून मुख्यमंत्री कमलनाथ यांनी एका मंत्र्याला 4 आमदारांना सांभळण्याची जबाबदारी दिली आहे. सरकारच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपाचे माजी मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी गोवा आणि कर्नाटकमधून उठलेलं वादळ मध्य प्रदेशच्या दिशेने वाहत असून काही दिवसांत वातावरण ठिक होईल असा व्हॉट्सअप मॅसेज आल्याचं सांगत संकेत दिले आहेत. 

तर मध्य प्रदेशमधील अन्न पुरवठा मंत्री प्रद्युम सिंह तोमर यांनी सरकारवर कोणतंही संकट नसल्याचा दावा केला आहे. सरकारला कोणताही धोका नाही, हे सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असं आरोग्य मंत्री तुलसी सिलावट यांनी सांगितले आहे. तर भाजपा गेल्या 7 महिन्यांपासून स्वप्न बघत आहे. जे अद्याप साकार झालं नाही असा टोला मंत्री प्रदीप जयस्वाल यांनी भाजपाला लगावला आहे. 
2018 मध्ये झालेल्या मध्य प्रदेश निवडणुकीत भाजपाला 109 जागा तर काँग्रेसला 114 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपातील एका आमदाराला खासदारकीची संधी मिळाल्यामुळे भाजपाची संख्या 108 झाली आहे. सरकार स्थापनेसाठी 116 आमदारांची गरज आहे.

काँग्रेस सरकारला 1 समाजवादी पक्ष, 2 बसपा आणि 4 अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपा नेत्यांकडून सत्ता स्थापनेची स्वप्न पाहिली जात आहे असा दावा काँग्रेसने केला. तर ज्या बसपा आमदाराने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे तो आमदार सध्या नाराज आहे. शुक्रवारी विधानसभेत बसपा आमदार रामबाई यांनी त्यांच्या कुटुंबाला एक प्रकरणात गोवलं जात आहे असा आरोप केला. तसेच जर त्यांना न्याय मिळत नसेल तर राज्यात कोणाला न्याय मिळणार अशी नाराजी बसपा आमदाराने बोलून दाखविली त्यामुळे भाजपा नेते आनंदी आहेत. त्यामुळे आगामी काळात गोवा, कर्नाटकसारखं मध्य प्रदेशातही राजकीय संकट उभं राहील का यावर प्रश्नचिन्ह आहे.  
 

Web Title: As the Congress in Madhya Pradesh is fearing a Karnataka-like situation in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.