'देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांचा विश्वासघात', काँग्रेसच्या बैठकीतून खरगेंचा केंद्रावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 03:31 PM2024-08-13T15:31:01+5:302024-08-13T15:31:01+5:30

Congress Meeting : आज काँग्रेस मुख्यालयात पक्षाचे सर्व सरचिटणीस आणि प्रदेशाध्यक्षांची बैठक पार पडली.

Congress Meeting 'Betrayal of the poor and middle class of the country', Mallikarjun Kharge attacks the Center from the Congress meeting | 'देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांचा विश्वासघात', काँग्रेसच्या बैठकीतून खरगेंचा केंद्रावर हल्लाबोल

'देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांचा विश्वासघात', काँग्रेसच्या बैठकीतून खरगेंचा केंद्रावर हल्लाबोल

Congress Meeting : लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता काँग्रेसने (Congress) आगामी विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. या पार्श्वभूमीवर आज(दि.13) राजधानी दिल्लीत पक्ष मुख्यालयात पक्षाचे सरचिटणीस, प्रदेश प्रभारी आणि राज्यांच्या प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge), राहुल गांधी (Rahul Gandhi), केसी वेणुगोपाल यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. 

कोणत्या विषयावर चर्चा झाली?
मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत संघटना मजबूत करणे, आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी, जात जनगणनेची मागणी आणि एससी-एसटी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर चर्चा झाली. राहुल गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांकडून त्यांची मते, सूचना आणि पक्षाची राज्यांतील परिस्थितीबाबत प्रतिक्रिया घेतल्या.या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. जम्मू-काश्मीरमध्येही या वर्षी विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसची ही बैठक महत्वाची मानली जात आहे. 

गरीब आणि मध्यमवर्गीयांचा विश्वासघात झाला : खरगे
या बैठकीनंतर काँग्रेस मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर बेरोजगारी, महागाई आणि संविधानाच्या मुद्द्यावरुन हल्लाबोल केला. देशातील गरीब आणि मध्यमवर्गाचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, सेबी आणि अदानी यांच्यातील संबंधाचे धक्कादायक खुलासे झाले आहे, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशीची गरज आहे. छोट्या गुंतवणूकदारांचा पैसा शेअर बाजारात धोक्यात घालता येत नाही. मोदी सरकारने तात्काळ सेबी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करावी आणि या संदर्भात JPC (संयुक्त संसदीय समिती) स्थापन करावी.

जात जनगणनेची लोकांची मागणी
ते पुढे म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांना एमएसपीची कायदेशीर हमी मिळावी, या मागणीसाठी काँग्रेस पक्ष आपला लढा सुरूच ठेवणार आहे. देशातील तरुणांवर लादलेली अग्निपथ योजना सरकारने रद्द करावी. रेल्वे सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून ते म्हणाले की, गाड्या रुळावरून घसरणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. हवामान-संबंधित आपत्ती आणि ढासळत चाललेल्या पायाभूत सुविधा ही देखील चिंतेची कारणे आहेत. या प्रश्नांवर राष्ट्रीय मोहीम तयार करून लोकांपर्यंत जाणार असल्याचे खरगे यांनी सांगितले.

Web Title: Congress Meeting 'Betrayal of the poor and middle class of the country', Mallikarjun Kharge attacks the Center from the Congress meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.